Skin Cancer : मासेप्रेमी सावधान! मासे खाणाऱ्यांना होऊ शकतो 'स्कीन कॅन्सर'? धक्कादायक माहिती समोर

helath news : आज रविवार म्हणजे नॉनव्हेज लव्हर्ससाठी खाण्याचा वार. जर तुम्ही आज मासे खाण्याचा बेत आखत आहात तर आधी ही बातमी वाचा...

Updated: Nov 27, 2022, 12:34 PM IST
Skin Cancer : मासेप्रेमी सावधान! मासे खाणाऱ्यांना होऊ शकतो 'स्कीन कॅन्सर'? धक्कादायक माहिती समोर  title=
trending news Eating Fish Can Cause Skin Cancer and Tuna fish is more dangerous nmp

Eating Fish Can Cause Skin Cancer : नॉनव्हेज लव्हर्ससाठी (Nonveg Lovers) महत्त्वाची बातमी आहे. नॉनव्हेज म्हटलं की अंडी (egg), चिकन (Chicken), मटण (mutton) आणि मासे (fish)...मुंबई (Mumbai), कोकण (Konkan), गोव्यासह (Goa) जगात अनेक मासेप्रेमी (fish lover) आहेत. पण जास्त प्रमाणात मासे खाणाऱ्यांना स्कीन कॅन्सर (Skin cancer) होऊ शकता, असा धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. एका संशोधनात हा दावा (Research claims) करण्यात आला आहे. या संशोधनात असं सांगण्यात आलं आहे की, मासे खाल्ल्याने गंभीर आणि जीवावर बेतणारा आजार होण्याची शक्यता आहे. 

काय दावा केला आहे संशोधनात

अल्ट्राव्हायोलेट (यूव्ही) किरण त्वचेच्या पेशींच्या डीएनएला नुकसान करतात, ज्यामुळे स्कीन कॅन्सर (Skin cancer) होण्याची भीती असते. ब्राऊन युनिव्हर्सिटीच्या (Brown University)संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, मासे खाल्ल्याने 'मेलेनोमा'(Melanoma) म्हणजे एका प्रकारचा कर्करोगाचा धोका वाढतो. जे लोक दर आठवड्याला 300 ग्रॅम मासे खातात त्यांना प्राणघातक 'मेलेनोमा'चा 22 टक्के जास्त धोका असतो. या संशोधनात 62 वर्षे वयाच्या 4 लाख 91 हजार 367 प्रौढांनी भाग घेतला. या संशोधनात लोकांनी तळलेले मासे, भाजलेले मासे किंवा 'टूना फिश' (Tuna fish) खाल्ले होते. (trending news Eating Fish Can Cause Skin Cancer and Tuna fish is more dangerous)

टुना फिश अधिक घातक

या संशोधनात असाही खुलासा करण्यात आला आहे की, टुना फिश ही अधिक घातक आहे.टुना फिश खाणाऱ्यांमध्ये मेलेनोमाचा धोका 20 टक्के जास्त होता. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे तळलेले मासे खाल्लेल्यांमध्ये कॅन्सरचा धोका नव्हता.