खुशखबर...ही लस १२ वर्षांच्या मुलांवरही प्रभावी असल्याचा कंपनीचा दावा

लसीच्या अभावामुळे लोकांचे लसीकरण थांबले आहे. त्यातच एक चांगली आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. 

Updated: May 26, 2021, 05:43 PM IST
खुशखबर...ही लस १२ वर्षांच्या मुलांवरही प्रभावी असल्याचा कंपनीचा दावा title=

मुंबई : जगभरात कोरोनाच्या महामारीने हाहाकार माजवला आहे. अशात सगळीकडे लसीकरणाला सुरवात झाली आहे. परंतु लसीच्या अभावामुळे लोकांचे लसीकरण थांबले आहे. त्यातच एक चांगली आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. मॉडर्नाने मंगळवारी असा दावा केला की, कोविड-19 ची त्यांची लस ही इतर लोकांबरोबरच लहान मुलांवरही प्रभावी ठरु शकतो. यासह, ही लस अमेरिकेतील लसीचा दुसरा पर्याय बनण्याच्या मार्गावर आहे.

अमेरिकेने आणि कॅनडाने या महिन्याच्या सुरूवातीला 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिली जाणारी आणखी एक लस - फायझर आणि बायोटेक यांच्या मदतीने तयार केली आहे. मॉडर्ना ला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी पुढील महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाला तसेच इतर जागतिक नियामकांना आपला डेटा सादर करणार असल्याचे सांगितले आहे.

कंपनीने 12 ते 17 वर्षे वयोगटातील 3700 मुलांचा अभ्यास केला. सुरुवातीच्या निकालांमध्ये असे दिसून आले की, ही लस प्रौढांप्रमाणेच लहानमुलांसाठी देखील रोगप्रतिकारक शक्तीच्या संरक्षणावर कार्य करते. परंतु हाताला सूज, डोकेदुखी आणि थकवा यांसारख्या परिणाम देखील त्यांच्यात पाहायला मिळाला.

आतापर्यंत 316 मुलांचा मृत्यू

कंपनीने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, पहिली लस दिल्याच्या दोन आठवड्यांनंतर ती 93 टक्के प्रभावी असते. प्रौढांपेक्षा कोविड -19 मध्ये आजारी पडण्याचा धोका मुलांमध्ये कमी असतो, परंतु ते देशातील कोरोना व्हायरसच्या 14% प्रकरणांमध्ये प्रतिनिधित्व करतात. अमेरिकन अॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या आकडेवारीनुसार, केवळ अमेरिकेतच 316 मुले मरण पावली आहेत.

लसीकरण केंद्रावर पोहचतायत लहान मुले

नियामकांकडून मान्यता मिळाल्यानंतर, लहान मुले अमेरिकेत लसीकरण केंद्रांवर फायजर लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुढे आले. पुढील शैक्षणिक सत्रापूर्वी अधिकाधिक किशोरवयीन मुलांना लसी देण्याचा प्रयत्न आहे. फायझर आणि मॉडर्ना या दोघांनीही 11 वर्ष ते सहा महिन्यांपर्यंतच्या मुलांची लसीकरणाची चाचणी सुरू केली आहे.