वॉशिंग्टन : काही काळापासून निशाण्यावर असणाऱ्या china चीनवर अमेरिकेकडून आणखी एक गंभीर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. अमेरिकेच्या २४४ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं संबोधनपर भाषणातून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशातील सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीसाठी थेट चीनला दोषी ठरवलं आहे. देशात चीनधून आलेल्या कोरोना व्हायरसचा शिरकाव होत नाही, तोवर सारंकाही सुरळीत होतं असं म्हणत चीनवर त्यांनी आगपाखड केल्याचं पाहायला मिळालं.
'विदेशी जमिनीवर लावण्यात आलेल्या करांमुळं अमेरिकेला पुढील अनेक दशकांसाठी फायदा मिळवून दिला आहे. ज्यामुळं आम्ही मोठे करार करु शकू. यापूर्वी ही परिस्थिती नव्हती. मोठ्या संख्येनं अनेक राष्ट्रांकडून अमेरिकेकडे संपत्ती येत होती. पण, यामध्येच चीनकडून आलेला कोरोना व्हायरस अमेरिकेवर धडकला आणि आम्ही प्रभावित झालो', असं ट्रम्प म्हणाले. असं असताना गाऊऩ, मास्क आणि शस्त्रक्रियेसाठीची आवश्यक सामग्री यांची निर्मितीही आपण करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार यापूर्वी या सर्व गोष्टी विशेषत: चीनध्ये तयार केल्या जात होत्या. जेथूनच हा कोरोना व्हायरस आणि अन्य गोष्टीही आल्या. चीननं हा व्हायरस साऱ्या जगापासून लवपला ज्यामुळं तो सर्वत्र पसरला. यासाठी चीनच सर्वतोपरी जबाबदार आहे. चीनवर आरोपांचा मारा करणाऱ्या ट्रम्प यांनी आपला देश अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं प्रगती करत असल्याचं ठाम मतही मांडलं.
देशापुढं असणाऱ्या कोरोना व्हायरच्या संकटाविषयी सांगत असताना ट्रम्प यांनी सद्यस्थितीला देशात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवल्याचंही सांगितलं. शिवाय त्यांनी आपल्या देशासोबतच इतरही राष्ट्रांकडून कोरोनावरील लस शोधण्यासाठी प्रयत्नांबद्दल आभारही व्यक्त करत वर्षअखेरीपर्यंत कोरोनावरील लस उपलब्ध होणार असल्याची आशा व्यक्त केली.