नवी दिल्ली : अमेरिकेने इशारा दिल्यानंतर देखील उत्तर कोरियाने मिसाईल परीक्षण केलं. रविवारी उत्तर कोरियाने शक्तिशाली हायड्रोजन बॉम्बचं परीक्षण केलं. या परीक्षणवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने सोमवारी तातडीची बैठक बोलावली आहे.
उत्तर कोरियाने रविवारी घोषणा केली होती की हायड्रोजन बॉम्बचं यशस्वी परीक्षण केलं. संयुक्त राष्ट्राने अमेरिकेचे राजदूत निकी हेली यांनी आपल्या ट्विटरवर याची माहिती दिली.
निकी हेलीने ट्वीट केलं की, 'जपान, फ्रान्स, युनाइटेड किंगडम आणि साउथ कोरियासोबत मिळून आम्ही सोमवार उत्तर कोरियाच्या मुद्द्यावर सुरक्षा परिषदेत तातडीची बैठक बोलावली आहे. संयुक्त राष्ट्राच्या ओपन चेंबरमध्ये ही बैठक होणार आहे.
याआधी संयुक्त राष्ट्राचे महासचिव ऐंतोनियो गुतेरसने देखील उत्तर कोरियाने केलेल्या हायड्रोजन बॉम्बचं परीक्षणावर टीका केली आहे. सुरक्षेला धक्का देणारं हे पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.