Russia Ukraine War : युक्रेनियन अभिनेत्रीच्या पाठीवर पंतप्रधान मोदींचं चित्र, पाहा फोटो

रशिया आणि युक्रेनमधील वादा, याचदरम्यान युक्रेनियन अभिनेत्रीच्या पाठीवरील पंतप्रधान मोदींचं चित्र चर्चेत...   

Updated: Feb 25, 2022, 09:23 AM IST
Russia Ukraine War : युक्रेनियन अभिनेत्रीच्या पाठीवर पंतप्रधान मोदींचं चित्र, पाहा फोटो title=

मुंबई : ‘अतिथी तुम कब जाओगे’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली युक्रेनियन अभिनेत्री नतालिया कोझीनोवा रशिया आणि युक्रेनमधील वादादरम्यान चर्चेत आली आहे. त्यामागे कारण देखील तसं आहे. नतालिया कोझीनोवाने 2015 साली पाठीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे  तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ओबामा यांचं चित्र पाठीवर काढल्यामुळे चर्चेत आली होती. 

भारत-अमेरिकेमधील संबंध सुधारत असल्याचा आनंद तिने हे चित्राद्वारे व्यक्त केला. पण आता  रशियाने युक्रेनमध्ये घुसखोरी केली असून युद्धाला सुरुवात केल्यानंतर अभिनेत्रीने पाठीकेढलेलं चित्र पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. 

नतालिया कोझीनोवा बद्दल सांगायचं झालं तर, तिने अनेक हिंदी वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल स्टारर  ‘अतिथी तुम कब जाओगे’ सिनेमात तिने पाहुण्या कलाकाराची भूमिका बजावली होती. 

याशिवाय तिने ‘तेरे जिस्म से जान तक’ ‘अंजुना बीच’, ‘लव्ह वर्सेस गँगस्टर’ सिनेमामध्ये देखील काम केली आहे. त्याचप्रमाणे 'गंदी बात' वेबसीरिजमध्ये बोल्ड सीनमुळे नतालिया चर्चेत आली. आता नतालिया लवकरचं  ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.