युक्रेनची नागरिकांना मोठी ऑफर, रशियन सैनिकाला ठार केल्यास इतकी मोठी रक्कम

रशियापुढे युक्रेन झुकणार नसल्याचं राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे हा लढा अधिक वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे युक्रेनकडून नागरिकांना लढ्यात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

Updated: Mar 1, 2022, 11:54 PM IST
युक्रेनची नागरिकांना मोठी ऑफर, रशियन सैनिकाला ठार केल्यास इतकी मोठी रक्कम title=

मुंबई : रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia-Ukraine war) सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत दोन्ही देशांना खूप फटका बसला आहे. सर्व बाजूंनी टीका होत असतानाही रशियाकडून हल्ले थांबलेले नाहीत. तर रशियाच्या हल्ल्यांना युक्रेन देखील सातत्याने प्रत्युत्तर देत आहे. रशियापुढे झुकणार नाही, असा निर्धार युक्रेनने केला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी मंगळवारी युरोपियन संसदेत केलेल्या भाषणातही आपली भूमिका स्पष्ट करत युक्रेनची जनता आणि युक्रेनचे लष्कर हुशार असल्याचे म्हटले आहे. ते संपेपर्यंत आम्ही लढू. 

युक्रेनच्या एका निर्णयाने मात्र सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. युक्रेनने आपली लष्करी ताकद वाढवण्यासाठी खुली भरती जाहीर केली आहे. यासोबतच युक्रेन सरकारही या लढाईत सहभागी असलेल्यांना मोठी रक्कम देणार आहे.

युक्रेनच्या लढ्यात पाठिंबा देणाऱ्यांना बक्षीस

आता युक्रेनने नागरिकांना युद्धात सामील होण्यासाठी मोठी ऑफर दिली आहे. युक्रेनच्या सरकारने युद्धात शस्त्र घेऊन युक्रेनसाठी लढणाऱ्यांना दीड लाख डॉलर्स दिले जातील, असे म्हटले आहे. यासोबतच या निवेदनात असेही म्हटले आहे की, शत्रू सैन्याच्या एका सैनिकाला ठार केले तर 300 डॉलरची अतिरिक्त रक्कमही दिली जाईल.

ही घोषणा युक्रेनच्या गुप्तचर विभागाने त्यांच्या टेलिग्राम चॅनलवर केली आहे. युक्रेनने रशियाविरुद्धच्या युद्धात सर्वसामान्यांना जास्तीत जास्त संख्येने सहभागी करून घेतल्याबद्दल इतके मोठे बक्षीस जाहीर केले आहे. ठार केल्यास $300 आणि शस्त्र हातात घेण्यासाठी $1.5 लाख ते 2.5 लाख इतका दर निश्चित करण्यात आला आहे.

रशियन सैन्याचा रणगाडा ताब्यात घेतला तर 2.5 लाख रिव्निया (युक्रेनियन चलन) दिले जातील. बख्तरबंद वाहने ताब्यात घेण्यासाठी दीड लाख रिव्निया, पायदळ लढाऊ वाहने ताब्यात घेण्यासाठी 2 लाख रिव्निया आणि रशियन सैनिकाला जखमी किंवा ठार करण्यासाठी $300.

रशियाच्या सततच्या हवाई हल्ल्यांमुळे लोक सुरक्षित ठिकाणांच्या शोधात आहेत. लाखो लोक युक्रेन सोडून गेले आहेत. युक्रेन सोडणाऱ्यांपैकी बहुतेक महिला, मुले किंवा वृद्ध आहेत. मोठ्या संख्येने लोकांनी देश सोडल्यानंतर, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी आदेश जारी केला आहे की युद्ध लढण्यास सक्षम तरुण आणि लोक देश सोडू शकत नाहीत.