आरोग्य मंत्र्यांना Kiss करणं पडलं भारी, फोटो समोर येताच दिला राजीनामा

सरकारसाठी मोठा झटका 

Updated: Jun 27, 2021, 06:45 AM IST
आरोग्य मंत्र्यांना Kiss करणं पडलं भारी, फोटो समोर येताच दिला राजीनामा title=

मुंबई : ब्रिटनमधील आरोग्य मंत्री मॅट हॅनकॉक यांचा खासगी फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हॅनकॉक महिला सहकर्मचारीला किस करताना दिसले. यानंतर अनेक प्रश्न उभे राहिले. हॅनकॉक यांच्यावर कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. (UK Minister Matt Hancock Resigns After Kissing Photos Trigger Covid Violation Row)  हा वाद समोर आल्यानंतर ब्रिटनचे बोरिस जॉनसन सरकार बॅकफूटवर आलं आहे. मॅट यांचा राजीनामा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी स्विकारला आहे. फक्त कोरोना काळात किस केल्यामुळे नाही तर याआधी तुम्ही केलेल्या कृत्यामुळे तुम्ही हे पद गर्वाने सोडायला हवं. 

42 वर्षीय हॅनकॉक यांनी जॉनसन यांना पाठवलेल्या राजीनाम्यात लिहिलं आहे की,'आपण कोरोना सारख्या महामारीपासून लढण्यासाठी एका देशाच्या रुपात खूप मेहनत केली आहे.' हॅनकॉक यांचा राजीनामा 'द सन' या वृत्तपत्रातून हॅनकॉक आणि जीना कोलाडांगेलो यांच्या किसींगचे फोटो प्रकाशित झाले आहेत.

हॅनकॉक गेल्या महिन्यात आपल्या कार्यालयात सहकर्मचारीसोबत गळाभेट घेतली. सुरूवातीला हॅनकॉक यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. आणि म्हटलं हे प्रकारण संपला आहे. याकरता त्यांनी माफी देखील मागितली होती. 

जॉनसन सरकारला मोठा झटका 

किस करण्याचा फोटोसमोर आल्यानंतर हे प्रकरण आणखी वाढलं. कंजर्वेटिव पार्टीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, 'मंत्र्यांचा व्यवहार चांगला नव्हता. कोरोनाच्या नियमांचा मंत्र्यांनी फज्जा उडवला. हेच नियम तयार करण्यात त्यांनी मदत केली होती.'

असं म्हटलं जातं की,'हॅनकॉक यांचं जाणं हे बोरिस जॉनसन आणि त्यांच्या सरकार करता मोठा झटका आहे. जॉनसन प्रशासन गेल्या काही काळापासून सतत वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. भ्रष्टाचार, गुप्त वित्तीय व्यवस्था ते सेक्स स्कँडलपर्यंत वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.तसेच आताचा आरोग्य मंत्र्यांचं हे प्रकरण कोरोना महामारीशी संबंधित आहेत. ज्या नियमांच पालन करण्यास त्यांनी नागरिकांना सांगितलं तेच नियम त्यांनी पायदळी तुडवले.'