लंडनमधून 'उबर' होणार का हद्दपार?

काळ्या-पिवळ्या टॅक्सीपेक्षा आजकाल 'ओला' आणि ' उबर' सारख्या सुविधा अधिक लोकप्रिय होत आहेत.  पण  लंडनमध्ये 'उबर'ला परवाना नुतनीकरणास मात्र परिवहन कंपनीने नकार दिला आहे. 

Updated: Sep 22, 2017, 07:33 PM IST
लंडनमधून 'उबर' होणार का हद्दपार?  title=

लंडन : काळ्या-पिवळ्या टॅक्सीपेक्षा आजकाल 'ओला' आणि ' उबर' सारख्या सुविधा अधिक लोकप्रिय होत आहेत.  पण  लंडनमध्ये 'उबर'ला परवाना नुतनीकरणास मात्र परिवहन कंपनीने नकार दिला आहे. 

 ऑनलाईन टॅक्सी सेवा देणारी 'उबर' ही अमेरिकन कंपनी जगभरात विविध देशांमध्ये सुविधा देत आहे. लंडन मध्ये ३० सप्टेंबरपर्यंत या कंपनीचा परवाना होता. मात्र ‘उबर’लंडनमध्ये टॅक्सी सेवा देण्यास सक्षम नाही असे कारण देत परिवहन विभागाने अर्ज फेटाळून लावला आहे. 

 लंडनमधील परिवहन विभागाच्या या निर्णायाला आव्हान  देण्यासाठी 'उबर' कंपनी कोर्टात जाणार आहे.या निर्णयाचा निकाल हाती येईपर्यंत उबर लंडनमध्ये आपली टॅक्सी सेवा सुरू ठेवणार आहे.  पण कोर्टाने 'उबर'च्या विरोधात निकाल दिल्यास कंपनीला लंडनमधून बाहेर पडावे लागण्याची शक्यता आहे. 

 'उबर' कंपनीने चालकांची निवड करताना त्यांची पार्श्वभूमी तपासली नाही, त्यांच्यावरील गुन्ह्यांची दखल घेतली नाही यामुळे परिवहन कंपनीने कारवाई केली असल्याची माहिती मिळाली आहे.