नवी दिल्ली : अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील संबंध अधिक कडू होत आहेत. दोन्ही देशांकडून एकमेकांना धमक्यां दिल्या जात आहेत. यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाच्या व्यावसायिक भागीदारांना लक्ष्य करण्यासाठी एक आदेशावर स्वाक्षरी केली आहे.
हा आदेशातून जे देश उत्तर कोरियाला कोणत्याही प्रकारचे आर्थिक मदत करतात आणि त्यांच्यासोबत व्यापार करतात त्यांना यातून टार्गेट करण्यात आलं आहे.
ट्रम्प यांनी उत्तर कोरियचा राजा किम जोंगने दिलेलं भाषण आणि अमेरिकेला पूर्णपणे नष्ट करण्याची धमकी दिल्यानंतर हे पत्रक काढलं आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, मी त्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे ज्यामुळे अमेरिकेच्या वित्त मंत्रालयाला उत्तर कोरियाला आर्थिक आणि व्यापारास मदत करणाऱ्या, व्यवसाय आणि संस्थांना लक्ष्य करण्यासाठी एक नवीन शक्ती मिळेल. जे वस्तू, सेवा आणि तंत्रज्ञानाचा पुरवठा करतात त्यांना देखील लक्ष्य केलं जाणार आहे.