न्यूयॉर्क येथे दोन मांजरींना कोरोनाची लागण

  आतापर्यंत केवळ मानवापर्यंत मर्यादित राहिलेला कोरोना पाळीव प्राण्यांमध्येही पसरु लागला आहे.  

Updated: Apr 23, 2020, 01:43 PM IST
न्यूयॉर्क येथे दोन मांजरींना कोरोनाची लागण title=
Pic Courtesy - twitter@DDNewsHindi

वॉशिंग्टन : आतापर्यंत केवळ मानवापर्यंत मर्यादित राहिलेला कोरोना पाळीव प्राण्यांमध्येही पसरु लागला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये दोन मांजरांना कोव्हिड-१९ आजाराला कराणीभूत ठरणाऱ्या सार्स COV-2 विषाणूंची लगण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेत पाळीव जनावरांमध्ये हा विषाणू पहिल्यांदाच आढळून आला आहे.

या मांजरी न्यूयॉर्क राज्यातील वेगवेगळ्या भागातील असून दोघांना श्वसनाच्या आजारामुळे त्यांना पशुवैद्याकडे नेण्यात आले. पहिली मांजर ज्या घरातून आली त्या रहिवाशांपैकी कोणातही कोरोनाची लक्षणे नव्हती तर दुसऱ्या मांजरीच्या घरातील मालकामध्ये मात्र कोरोची लक्षणे आढळून आली आहेत.

न्यूयॉर्कमधील दोन मांजरींना कोरोनाव्हायरस या कोविड-१९ची लागण झाल्याची माहिती फेडरलच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली. दोघांनाही श्वसनाच्या सौम्य लक्षणे होती. ही दोन्ही मांजर आता उपचारानंतर रिकव्हर होत आहेत.

अमेरिकेत कोरोनाव्हायरस पसरविण्यात पाळीव प्राण्यांची भूमिका आहे, याचा पुरावा अद्याप मिळालेला नाही. दरम्यान, या दोन्ही मांजरींना श्वसनाची लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांची चाचणी केली गेली आणि त्यांना न्यूयॉर्कच्या प्राणिसंग्रहालयात  क्वारंटाईन करण्यात आले आहे. ज्याठिकाणी आठ सिंह आणि वाघ ठेवले आहे. त्याठिकाणी त्यांना ठेवण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली.