Elon Musk Home : ट्विटरचा (twitter) अधिकृत ताबा घेतल्यानंतर एलॉन मस्क (Elon Musk) यानं त्याच्या आखणीनुसार या बड्या संस्थेमध्ये मोठे बदल करण्यास सुरुवात केली. महत्त्वाच्या हुद्द्यांवर असणाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवत त्यानं याची सुरुवात केली (Twitter Layoff). हळुहळू हे सत्र कर्मचाऱ्यांपर्यंत येऊन पोहोचलं. बरं, इतक्यावरच न थांबता आठवड्यातून 80 तास काम, वर्कफ्रॉम होमच्या (Work From Home) सुविधेचा अभाव अशा गोष्टींची वाच्यता करत मस्कनं अनेकांचीच झोप उडवली. असा बॉस कुणालाच मिळायला नको, अशीच प्रतिक्रिया अनेकांनी दिली. काहींना तर प्रश्नही पडला, की इतरांची झोप उडवून याला गाढ झोप कशी लागते?
खुद्द मस्कनंच याचं उत्तर दिलं आहे. ट्विटवर एक फोटो शेअर करत त्यानं Bedroom मधील काही फोटो सर्वांसमोर आणले आहेत (tweet by elon musk). यामध्ये मस्कच्या बेडशेजारी असणाऱ्या टेबलवर नेमक्या कोणत्या गोष्टी असतात, यावरून पडदा उठला आहे. सर्वसामान्यांच्या बेडशेजारी लॅम्प, पुस्तक, मोबाईल किंवा काही औषधं असता. पण, मस्त सर्वांहून वेगळाच म्हणावा. कारण, त्याच्या बेडशेजारी चक्क रिव्हॉल्वर, काही कोकचे टीन, पाण्याची बाटली अशा काही गोष्टी दिसत आहेत. (twitter ceo Elon Musk bedroom photo leaked as he shares a photo of Revolver besides his bed latest Marathi news )
My bedside table pic.twitter.com/sIdRYJcLTK
— Elon Musk (@elonmusk) November 28, 2022
मस्कनं आपल्या सोयीनुसार ठेवलेल्या या गोष्टी त्याला गाढ झोप देत असाव्यात असंच नेटकऱ्यांचं म्हणणं. त्यानं पोस्ट केलेला हा फोटो पाहताना अनेक नेटकरी असेही होते ज्यांनी मस्कच्या मानसिकतेवर आणि त्याच्या वृत्तीवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला.
गेल्या काही दिवसांपासून एलॉन मस्कनं ट्विटरमध्ये केलेले बदल पाहता त्यानं अनेकांचाच रोष ओढावला आहे. तिथे एक वाद शमत नाही, तोच दुसरीकडे इंटरनल बगच्या माध्यमातून कमीत कमी 5.4 मिलियन ट्विटर युजर्सची माहिती हॅकर फोरमवर ऑनलाईन लीक झाली. ऑनलाईन विक्रीसाठी 5.4 मिलियन जणांची माहिती आणि त्याव्यतिरिक्तही एका वेगळ्या ट्विटर अॅप प्रोग्रामिंग इंटरफेसच्या मदतीनं 1.4 मिलिटन ट्विटर प्रोफाईल काहीजणांमध्ये खासगी पातळीवर शेअर करण्यात आले. यामध्ये खासगी दूरध्वनी क्रमांक, ईमेल आणि इतर काही माहितीचा समावेश आहे.