Viral Video : खचाखच भरलेल्या मेट्रोमध्ये सीट मिळवण्यासाठी 'त्या' तरुणीने लढवली शक्कल, व्हिडीओ पाहून व्हाल अवाक्

Metro Viral Video : मेट्रोमधील बिकिनी गर्लचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मेट्रोमधील मिठी आणि किस करणारा कपलचा व्हिडीओ समोर आला. तो मेट्रोमध्ये चढला आणि बसायला जागा शोधायला लागला. पण खचाखच भरलेल्या मेट्रोमध्ये सीट मिळवण्यासाठी त्याने...

Updated: Apr 19, 2023, 03:40 PM IST
Viral Video : खचाखच भरलेल्या मेट्रोमध्ये सीट मिळवण्यासाठी 'त्या' तरुणीने लढवली शक्कल, व्हिडीओ पाहून व्हाल अवाक् title=
trending Video man doing drama to get seat in metro video viral on social media google trends

Trending Metro Video : दिल्ली मेट्रोमधील बिकिनी गर्लचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. तिची तुलना उर्फी जावेदसोबत करण्यात आली. त्यानंतर मेट्रोमधील किस आणि मिठी मारणाऱ्या जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. मग काय सोशल मीडियावर मेट्रोमधील अनेक व्हिडीओ झपाट्याने व्हायरल झालेत. आता अजून एका मेट्रोमधील तरुणाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

सार्वजनिक वाहनांतून प्रवास करताना तिथे जागा मिळविणे ही सगळ्या मोठी परीक्षा असते. मुंबई लोकल ट्रेन असो, मेट्रो ट्रेन असो ही कायम खचाखच भरलेली असते. मुंबई लोकल ट्रेनमधील महिला डब्ब्यात सीट वरुन महिलांमधील राडा आणि हाणामारीचे अनेक व्हिडीओ इंटरनेटवर पाहिला मिळतात. 

जागा मिळावी म्हणून त्याने चक्क...

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक तरुण मेट्रोमध्ये प्रवेश करतो. खचाखच भरलेल्या मेट्रोमध्ये त्याला बसायला जागा नव्हती. मग काय या पठ्ठ्याने चक्क एक शक्कल लढवली. त्या युक्तीनंतर एक नाही दोन नाही तब्बल सात आठ जणांनी त्याला बसायला जागा करुन दिली. 

तो तरुण उलट्या आल्याचं नाटक करतो ते पाहून मेट्रोमधील प्रवासी सैरभैर इकडे तिकडे पळायला लागतात. त्या प्रवाशांना भीती वाटते की तो तरुण त्यांचा अंगावर उलटी केली तर...म्हणून त्याचा आजूबाजूचे अनेक प्रवासी जागा सोडून दूर दुसऱ्या डब्ब्यात जातात. पुढे जे होतं पाहून तुम्ही नक्कीच थक्कं व्हाल. 

हा व्हिडीओ ट्विटरवर @NoContextHumans नावाच्या आयडीवर पोस्ट करम्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 2 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.