VIDEO : जिवंत मगरीसोबत पंगा घेणं पडलं भारी, हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडीओ VIRAL

Wild Animal Attack Video : सोशल मीडियावर बाइकवर मगर ठेवून त्यावर बसून एक तरुण रस्त्यावरुन जात असतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. अशातच जिवंत मंगरीसोबत खेळत एका व्यक्ती भारी पडलं आहे. 

Updated: Jan 22, 2023, 12:06 PM IST
 VIDEO : जिवंत मगरीसोबत पंगा घेणं पडलं भारी, हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडीओ VIRAL title=
Trending Video crocodile attack man What happens next is shocking Viral on Social media

Crocodile Attack Video : सोशल मीडियावर साप आणि मगरीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतं असतात. अंगावर काटा आणणारे आणि थरकाप उडविणारे हे व्हिडीओला सोशल मीडियावर तुफान व्हयूज मिळतात. जंगली प्राण्यासोबत हुशारी करणं म्हणजे मृत्यूला ओढवून घेणं असतं. अशातच एक व्यक्ती बाइकवर मगर ठेवून त्यावर बसून गाडी चालवताना दिसतं आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉकमध्ये असतानाच अजून एक मगरीची व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतं आहे. 

अन् होत्याचं नव्हतं झालं

साप आणि मगर त्यांचं नाव घेतलं तरी आपल्याला घाम फुटतो पण या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती जिवंत मगरीसोबत खेळायला गेला. खरं तर या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती मगरीच्या जवळ जाऊन त्याचा पाठीवर स्पर्श करण्यासाठी जातो. पण मगरीला त्या व्यक्तीचं स्पर्श करणं आवडतं नाही अन् ती आक्रमक होते. या व्यक्तीला मगरीसोबत पंगा घेणं चांगलच महागात पडतं. मगरीच्या हल्ल्यात माणसाच्या हाताला जखम झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतं आहे. 

थरकाप उडविणारा व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म animals_powers या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर केल्यापासून 7 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्यक्तीने हे कृत्य करुन आपल्या जीव धोक्यात घातला. हा व्हिडीओ पाहून आपण काही क्षणासाठी निशब्द होतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.