तुम्ही पण किचनमध्ये मोबाईल घेऊन जाता? मग आधी हा VIDEO बघा

Viral Video : अनेकांना मोबाईल प्रत्येक ठिकाणी घेऊन जायची सवय असते, वॉशरुममध्ये असो किंवा घरातील किचनमध्ये मोबाईल हवाच. जर तुम्हाला स्वयंपाकघरात मोबाईल घेऊन जाण्याची सवय असेल तर आधी हा व्हिडीओ नक्की बघा. आयुष्यात परत कधी घेऊन जाणार नाही मोबाईल. 

नेहा चौधरी | Updated: Aug 23, 2023, 10:39 AM IST
तुम्ही पण किचनमध्ये मोबाईल घेऊन जाता? मग आधी हा VIDEO बघा title=
Trending News never use mobile in kitchen shocking video viral on Internet today trends in marathi

Shocking Viral Video : मोबाईल हा लोकांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग झाला आहे. त्याशिवाय जगणंही कठीण असं काही जणांना वाटतं. सतत प्रत्येक ठिकाणी त्यांच्यासोबत मोबाईल दिसतो. एका सेकंदसाठी मोबाईल नसला तर माणूस अस्वस्थ होतं असं म्हणं वावग ठरणार नाही. वॉशरुम असो किंवा किचन प्रत्येक ठिकाणी शरीरा एक भाग असल्यासारखा हा मोबाईल सतत सोबत असतो. अगदी रात्री झोपल्यानंतर आपल्या उशीजवळ तो ठेवलेला असतो. जर तुम्हाला किचनमध्ये मोबाईल घेऊन जायची सवय असेल तर आधी हा व्हिडीओ पाहा. (Trending News never use mobile in kitchen shocking video viral on Internet today trends in marathi )

अन् एका क्षणात...

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ अतिशय भयानक आहे. यामध्ये व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका व्यक्तीला किचनमध्ये मोबाईल घेऊन जाणे महागात पडल आहे. झालं असं की, तुम्ही पाहू शकता या व्हिडीओमध्ये तो व्यक्ती गॅस लावण्याचा प्रयत्न करत आहे. थोड्याच वेळात त्याचा लक्षात येतं की, गॅस गळू लागतो. तो घाबरतो आणि गॅस उचलून तो दूर घेऊन जातो. त्याचा आवाज ऐकून कुत्र्याही तिथे येतो. 

ती व्यक्ती तिथून पळून जातात असतानाही मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्यामुळे अर्नथ घडतो. तो माणूस त्याचा मोबाईल तिथेच विसरतो आणि क्षणात होत्याचं नव्हतं होतं. गॅस गळतीमुळे संपूर्ण स्वयंपाकघरात धूर पसरतो. हा धूर मोबाईलच्या संपर्कात येतो अन् क्षणात मोठा स्फोट घडतो. 

स्फोटाची ही घटना किचनमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. kbkonline या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 

हेसुद्धा वाचा - आई गं! महिलेने दिला 'एलियन' सारख्या मुलाला जन्म, डॉक्टरांनाही बसला धक्का! Video Viral

स्फोटामागील कारण की...

मोबाईल फोनमधून निघणारे रेडिएशन हे किती धोकादायक असतात या व्हिडीओवरून ते सिद्ध झाले आहे. जेव्हा गॅस गळती होते आणि मोबाईलमधील रेडिएशन यांचा संपर्क होतो तेव्हा मोठा स्फोट होतो. त्यामुळे तुम्हाला किचनमध्ये मोबाईल घेऊन जाण्याची सवय असेल तर आजच ही सवय बंद करा.