Trending News : अजब प्रेमाची गजब कहाणी! कॅब ड्रायव्हर आवडला म्हणून 7 तासांच्या प्रवासासाठी उडवले 2 लाख

Love Story : असं म्हणतात प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं. एका तरुणीची लव्ह स्टोरी सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होते आहे. ही अजब प्रेमकहाणी ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. 

Updated: Dec 20, 2022, 06:32 AM IST
Trending News : अजब प्रेमाची गजब कहाणी! कॅब ड्रायव्हर आवडला म्हणून 7 तासांच्या प्रवासासाठी उडवले 2 लाख  title=
Trending News Love Story Friendship With Cab Driver 2 lakhs spent on the entire trip nmp

Friendship With Cab Driver :  दैनदिन आयुष्यात प्रवास करताना आपण अनेक वेळा कॅबचा वापर करतो. ओला (Ola) आणि उबेर (Uber) सारख्या कॅबमुळे आपल्या प्रवास सुखकर झाला आहे. पण ग्राहक कॅब ड्रायव्हरशी (Cab Driver) कामापूर्त बोलतात. त्यांना अनेक जण हडतुड करतानाही आपण पाहिलं आहे. पण एक तरुणी चक्क कॅब ड्रायव्हरच्या प्रेमात (Love Story) पडली आणि तिने जे काही केलं त्यानंतर तर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. 

काय आहे नेमकं प्रकरण ?

डेली मेलच्या बातमीनुसार, इमोजेन निकोल्सन (imogen nicholson) नावाची मुलगी 19 वर्षांची असून ती ब्रिटनची रहिवासी आहे. श्रीमंत कुटुंबातील या मुलीला तिच्या आजोबांच्या वाढदिवसाच्या पार्टीला जायचं होतं. म्हणूनच त्याने कॅब बुक केली. तिने लंडन ते डरहम पर्यंत उबेर बुक केली. अनेक कॅब चालकांनी त्यांना या प्रवासासाठी नकार दिला होता, मात्र अखेर या प्रवासासाठी 52 हजार 848 रुपयांची मागणी करणारा एक चालक सापडला. (Trending News Love Story Friendship With Cab Driver 2 lakhs spent on the entire trip)

 

हेसुद्धा वाचा - Video  : डोक्यावर आपटलीय का? दारु पिऊन तरुणीने भर रस्त्यात काढले कपडे...

 

अजब प्रेमाची गजब कहाणी! 

या प्रवासात इमोजेन निकोल्सनला ड्रायव्हर आवडला. यामुळे ती डरहमला गेली नाही तर इतर अनेक ठिकाणी फिरायला गेली आणि त्याच ड्रायव्हरसोबत परत आली. या ट्रिपमध्ये इमोजेनने 2 लाख रुपये खर्च केले. एवढंच नाही तर या सहलीचा खर्चाचा स्क्रीनशॉट तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.   

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

इमोजेनने सांगितलं की या काळात तो इतका चांगला मित्र बनला की हा प्रवास त्याला नेहमी लक्षात राहील.