Trending News : 'छप्पर फाडके' ! चिमुकलीला मिळाली एक छोटीसी स्लिप, क्षणात मिळाले 24 लाख रुपये

 Viral News :  चिमुकलीच्या आयुष्यात एक अशी गोष्ट झाली की, ज्याचा कोणीही कधीही विचार केला नसेल. देव जेव्हा देतो तेव्हा छप्परफाड देतो, ही म्हण तंतोतंत या मुलीला जुळते. 

Updated: Jan 14, 2023, 05:58 PM IST
Trending News : 'छप्पर फाडके' ! चिमुकलीला मिळाली एक छोटीसी स्लिप, क्षणात मिळाले 24 लाख रुपये title=
Trending news Little Girl Won Jackpot lottery got 24 lakh rupees viral marathi news

Lottery Ticket :  देव जेव्हा पण देतो तेव्हा छप्पड फाड देतो, अशी म्हणं आहे. लक्ष्मी कधी आपल्या घराचा दरवाजे ठोठावले हे कोणाला माहिती नसतं. अनेक जण कष्ट न करता श्रीमंत होण्यासाठी लॉटरीचे तिकीट विकतं घेतात. पण ही लॉटरी पण प्रत्येकाला लागतेच असं नाही. त्यासाठी पण नशिब लागतं. पण एका चिमुकलीला कागदाची एक स्लिप मिळाली आणि मग काय कोणाच्या धानीमनी नसतानाही ती आज लाखोंची मालकीण झाली. 

चमत्कार याला म्हणतात!

मीडिया रिपोर्टनुसार चिमुकलीच्या पालकांनी ख्रिसमसच्या दिवशी गिफ्ट आणले होते. त्याच एका गिफ्टमध्ये एक स्लिपही होती. सुरुवातीला त्या गिफ्टच्या बॉक्समध्ये काय आहे कोणालाही माहिती नव्हतं. काही दिवसांनी त्या लहान मुलीने ती स्लिप पाहिली आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला. 

त्या एका स्लिपने नशीब पालटलं!

ती स्लिप म्हणजे लॉटरीचं तिकीट होती. मेरीलँड लॉटरीच्या पेपरमिंट पेआउट गेमची तीन लॉटरीची तिकीटं होती. त्या मुलीने एक एक करुन त्या तिकीटवरील नंबर खरडायला सुरुवात केली. पहिली दोन तिकीट मधून तिच्या नशीबात काही नव्हतं. आता ती निराश झाली होती तरीदेखील तिने तिसरं तिकीट स्क्रॅच केले तेव्हा मुलीचं नशीब चमकलं. (Trending news Little Girl Won Jackpot lottery got 24 lakh rupees viral marathi news )

एक नाही, तीन नाही तब्बल 24 लाखांचा जॅकपॉट 

तिसऱ्या क्रमांकात मुलीच्या नावाने 30 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 24.45 लाख रुपयांचा जॅकपॉट निघाला. ही घटना अमेरिकेतील मेरीलँडची आहे. जर्मनटाउनमध्ये राहणाऱ्या या लहानश्या चिमुरडीला ख्रिसमसचं गिफ्ट मालामाल करुन गेलं. यापूर्वी अमेरिकेतच एका ट्रक ड्रायव्हरने लॉटरीचं तिकीट जिंकलं होतं. या चालकाच्या ट्रकचे ओडोमीटर तुटले. या तुटलेल्या ओडोमीटरवर एक नंबर होता. त्याने या क्रमांकाचे तिकीट खरेदी करून लाखो जिंकले.