मैत्रीण असावी तर अशी! मित्रांना Girlfriend नाही म्हणून केलं असं काही की...

Trending News : तुम्हाला माहिती शेवटी त्यांच्या मैत्रिणीने पुढाकार घेतला आणि एक भन्नाट आयडिया शोधून काढली. या मैत्रिणी आपल्या मित्रांसाठी एक जाहिरात दिली. 

Updated: Sep 26, 2022, 03:34 PM IST
मैत्रीण असावी तर अशी! मित्रांना Girlfriend नाही म्हणून केलं असं काही की... title=
Trending News Boys Need Girlfriends on 2 lakh Salary NM

Girlfriend Salary : जर एखादी गोष्ट विकायची असेल तर आपण जाहिरात देतो. गेल्या काही वर्षांमध्ये मार्केटिंग क्षेत्रात खूप प्रगती झाली आहे. आज प्रत्येक गोष्टींची मार्केटिंग (Marketing) केली जाते. सध्या सोशल मीडियावर (Social media) अजब जाहिरात (Advertising) सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तुम्ही आतापर्यंत कुठल्या कुठल्या हटके जाहिराती पाहिल्या आहेत. आम्हाला शंभर टक्के गँरेटी आहे तुम्ही अशी जाहिरात कधी पाहिली नसेल. 

आम्हाला सांगा तुम्हाला गर्लफ्रेंड आहे, अहो थांबा हे विचारण्यामागे कारण असं की, या पठ्ठ्याची जाहिरात ऐकली की तुम्हाला आमच्या प्रश्न कळेल. काही लोकांना सहज Girlfriend मिळते, तर काहींना खूप मेहनत करावी लागते. तर काही पठ्ठे असे असतात की काही करुनही त्यांना Girlfriend च मिळतं नाही. 

असाच काहीसा प्रकार या जाहिरातीलमधील तरुणांसोबत झाला आहे. त्यांनी डेटिंग साइटवर (Dating site)Girlfriend  मिळवण्यासाठी प्रोफाइलही टाकलं तरी त्यांचं नशिब उजळलं नाही. तुम्हाला माहिती शेवटी त्यांच्या मैत्रिणीने पुढाकार घेतला आणि एक भन्नाट आयडिया शोधून काढली. या मैत्रिणी आपल्या मित्रांसाठी एक जाहिरात दिली. ती म्हणजे महिन्याला 2 लाख रुपये घ्या आणि Girlfriend बना. विशेष म्हणजे तिच्या या जाहिरातीवर अनेक अर्जही येतं आहे. (Trending News Boys Need Girlfriends on 2  lakh Salary NM)

चिनी मुलांना थाई गर्लफ्रेंड हव्या!(chinese boy need thailand girlfriend)

गर्लफ्रेंडच्या शोधात असलेले दोन्ही मुले हे चीनचे आहेत, तर त्यांची मैत्रिण थायलंडची रहिवासी आहे. Ok Mai Mai नावाच्या फेसबुक पेजद्वारे त्याने आपल्या मित्रांसाठी गर्लफ्रेंड शोधण्याचं मिशन सुरू केलं आहे. नोकरीची पोस्ट टाकताना त्याने लिहिलं आहे की, 'माझे दोन चिनी मित्र मैत्रिणी शोधत आहेत. मैत्रिणीचं वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावं. गर्लफ्रेंडला 2.16 लाख रुपये पगार मिळणार आहे. जर त्यांना तुमचं काम आवडलं तर तुम्हाला जास्त पैसे मिळतील. ते दोघेही माझे मित्र आणि चांगले लोक आहेत.

2 लाख पगार पण अटी लागू...(Terms apply)

गंमत म्हणजे या नोकरीसाठी या तरुणीने काही अटीही दिल्या आहेत. 

1. इच्छुक उमेदवार कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज सेवन करणारी नसावी किंवा तिल्या कुठलीही इतर समस्या नसावी. 

2. तिला चिनी भाषा अवगत असावी 

3. ती तिच्या कामात चांगली असावी. 

ही पोस्ट आल्यापासून सर्व मुलींनी त्यासाठी अर्ज केले आहेत. अनेक यूजर्स या जाहिरातीवर कमेंट करताना त्यांचं चिनी भाषेचं ज्ञान देखील दर्शवलं आहे. thethaiger च्या अहवालानुसार, या नोकरीसाठी उमेदवाराची निवड झाली असून आता ही जाहिरात काढण्यात आली आहे.  यानंतर तुम्हाला पण असं वाटतं असेल ना, की आम्हाला पण हवी अशी मैत्रिण...