Treasure found at Egypts Coast: इजिप्तमध्ये संधोधकांच्या हाती मौल्यवान खजिना लागला आहे. या खजिन्याची किंमत अब्जावधी डॉलरमध्ये असल्याचे सांगितले आहे. यूरोपियन इंस्टीट्यूट फॉर अंडरवाटर आर्कियोलॉजी (IEASM)ने प्रेस रिलीज जारी करुन खजिन्याबाबत माहिती दिली आहे. प्रेस रिलीजमध्ये म्हटलं आहे की, इजिप्तमधील भूमध्यसागराच्या तटावर पाण्यात बुडालेल्या एका मंदिरात हा खजिना सापडला आहे. फ्रेंच पुरातत्वशास्त्रज्ञ फ्रँक गोडिओ यांच्या नेतृत्वाखालील संशोधकाच्या पथकाने थॉनिस-हेराक्लिओन शहरातील पाण्याखाली असलेल्या अमून देवाच्या मंदिराच्या ठिकाणी संशोधन केले होते. तेव्हा हा खजिना सापडला आहे.
संशोधकांच्या पथकाने शहराच्या दक्षिणेकडील कालव्याची तपासणी केल्याचे IEASM कडून सांगण्यात आले आहे. प्राचीन मंदिराची आता पडझड झाली असून फक्त दगडांचा साचा उरला आहे. इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकाच्या मध्यात एका आपत्तीजनक घटनेत मंदिर कोसळले होते. हे मंदिर अमून नावाच्या देवाचे होते. प्राचीन इजिप्शियन सर्वोच्च राजे या देवस्थानात शक्ती प्राप्त करण्यासाठी येत असे. IEASM ने सांगितले की, मंदिराच्या खजिन्यात मौल्यवान वस्तू सापडल्या आहेत. यामध्ये चांदीची पूजेची साधने, सोन्याचे दागिने आणि परफ्यूम यांचा समावेश आहे.
इजिप्तचा पर्यटन विभाग आणि पुरातत्व विभागाच्या मंत्रालयाने गॉडडियोच्या पथकासोबत संयुक्तपणे पाण्याखालील संशोधन केले होते. पाण्याखाली असलेल्या जमिनीचे खोदकामदेखील करण्यात आले होते. संशोधनानुसार, आत्तापर्यंत जे सामान मिळालं होतं त्यानुसार पाचव्या शतकात लाकडापासून मंदिराचे बांधकाम करण्यात आले होती. व खूप चांगल्या पद्धतीने त्याला संरक्षित करण्यात आले होते. आयईएएसएमचे प्रमुख गोडिओ म्हणाले की, अशा नाजूक वस्तूंचा शोध घेणे खूप भावनिक आहे. आजूबाजूला हिंसाचार आणि होलोकॉस्टची भीषणता असूनही हा वारसा अबाधित राहिला आहे.
नव्या तंत्रज्ञानामुळं या खजिन्याचा शोध लागला आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या गुहा आणि वस्तू शोधल्या जाऊ शकतात. अमून देवाच्या मंदिराच्या पूर्वेकडे ऍफ्रोडाईटला समर्पित ग्रीक मंदिर देखील सापडले, ज्यामध्ये कांस्य आणि सिरॅमिक वस्तू होत्या. सेट राजघराण्याच्या फारोच्या काळात (664 - 525), ज्या नागरिकांना शहरात व्यापार आणि स्थायिक होण्याची परवानगी होती त्यांच्या देवतांची मंदिरे होती, असं संशोधनातून दिसून येत आहे.