मोदी इफेक्ट : चीनमध्येही राबवणार स्वच्छता अभियान

स्वच्छ भारत अभियानामुळे संत गाडगेबाबा, महात्मा गांधी यांची प्रतिमा काहीशी झाकोळून गेली असली तर, मोदींची प्रतिमा मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर विस्तारत असल्याचे चीत्र आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 27, 2017, 08:42 PM IST
मोदी इफेक्ट : चीनमध्येही राबवणार स्वच्छता अभियान title=

बीजींग : स्वच्छ भारत अभियानामुळे संत गाडगेबाबा, महात्मा गांधी यांची प्रतिमा काहीशी झाकोळून गेली असली तर, मोदींची प्रतिमा मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर विस्तारत असल्याचे चीत्र आहे.

शी जीनपींग यांनीही दिला 'शौचालय क्रांती'चा नारा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेत आल्यावर नव्याने आणि काहीशा आक्रमकपणे राबविलेल्या स्वच्छ भारत अभियानाची देशात चांगलीच चर्चा रंगली. विशेष असे की, या अभियानाची चर्चा केवळ देशापूरती मर्यादीत न राहता आंतरराष्ट्रीय पातळीवरही झाली. होत आहे. भारताचा शेजारी आणि पर्यायाने स्पर्धक असलेल्या चीननेही या अभियानाची दखल घेतल्याची चर्चा आहे. कारण, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपींग यांनीही चीनमध्ये 'शौचालय क्रांती'चा नारा दिला आहे. 'शौचालय क्रांती'मुळे देशांतर्गत पर्यटनाला चालना मिळेल असे जीनपींग यांचे मत आहे.

चौसष्ट हजार शौचालये बांधण्याचे उद्दीष्ट

वृत्तसंस्था सिन्हुआने सोमवारी शी जीनपींग यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात 'शौचालयाची निर्मिती ही शहर आणि ग्रामीण भागाला नवी ओळख देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. तसेच, नागरिकांना सार्वजनीक सुविधा मिळाल्याने त्यांचे जीवनमान उंचावायलाही मदत होणार आहे', असे जीनपींग यांनी म्हटले आहे. चीनच्या राष्ट्रीय पर्यटन प्रशासनाने 2018 ते 2020पर्यंत देशातील पर्यटन स्थळांवर सुमारे 64,000 शौचालय बांधण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. चीनने केवळ उद्दीष्टच ठेवले नाही तर, पाठीमागच्या महिन्यापासून थेट कामालाही सुरूवात केली आहे.

2015मध्येच 'शौचालय क्रांती'ला सुरूवात

दरम्यान, चीनमधील शौचालय क्रांतीची माहिती आता बाहेर आली असली तरी, प्रत्यक्षात या क्रांतीची सुरूवात 2015लाच झाली होती. चीनमधील पर्यटन स्थळांवर शौचालय आणि इतर स्वच्छेताचा मोठा आभाव आहे. त्यामुळे ही स्थिती बदलण्यासाठी चीनने ही मोहीम हाती घेतली आहे. 'शौचालय क्रांती' असे या मोहिमेला नाव देण्यात आले आहे.