टॉयलेट कमोड मधुन येत होते चित्र विचित्र आवाज; झाकण उघडून पाहिले असता बसला मोठा धक्का

ऑस्ट्रेलियामध्ये एका व्यक्तीला घरात असलेल्या टॉयलेटमध्ये धक्कादायक दृष्य दिसले. याचा व्हिडिओ त्याने सोशल मिडियावर शेअर केला आहे. 

Updated: Aug 26, 2023, 10:30 PM IST
टॉयलेट कमोड मधुन येत होते चित्र विचित्र आवाज; झाकण उघडून पाहिले असता बसला मोठा धक्का title=

Ajab Gajab News :  जगात अनेक चित्र विचित्र घटना घडत असतात. अशीच एक भयानक घटना ऑस्ट्रेलियामध्ये घडली आहे. एका व्यक्तीच्या घरात टॉयलेट कमोड मधुनचित्र विचित्र आवाज  येत होते. त्याने टॉयलेट कमोड चे झाकण उघडून पाहिले असता समोर जे दिसले ते पाहून मोठा धक्का बसला. कमोडमध्ये अशी वस्तू दिसली की त्याने असं काही तरी दिसे शकते याची या वक्तीला कल्पना देखील नव्हती. याचा व्हिडिओ बनवून त्याने हा धक्कादायक अनुभव सोशल मिडियावर शेअर केला आहे. 
ऑस्ट्रेलिया हे एक असे ठिकाण आहे जेथे जंगली प्राणी आणि सरपटणारे प्राणी थेट लोकांच्या घरात संचार करतात. असा परिसरात हा प्रकार घडला आहे. या परिसरात राहणाऱ्या लोकांच्या घरात, बाल्कनीत, बाथरुममध्ये तसेच टॉयलेटमध्ये साप, अजगर तसेच इतर सरपटणारे नेहमीच आढळतात. आता मात्र, एका व्यक्तीच्या घरात टॉयलेटमध्ये बेडूक आढळून आले आहेत. 

सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल

@frog.lover_life नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे. या  व्हिडिओला 1,202,440 likes आले आहेत. अनेक जण या व्हिडिओवर कमेंट देखील करत आहेत.

नेमकं काय घडलं?

सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर करत या व्यक्तीने आपला अनुभव शेअर केला आहे. टॉयलेमधून चित्र विचित्र आवाज येत होते. म्हणून मी टॉयलेट कमोडचे झाकण उघडून पाहिले. या मध्ये मला एक दोन नव्हे तर तब्बल 30 पेक्षा बेडूक दिसले. हिरव्या रंगाचे हे बेडूक फारच विचित्र आणि भयावह दिसत होते. एकदम ऐवढे बेडूक पाहून मी घाबरलो असे या व्यक्तीने सांगितले.

 

बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह मगरीच्या पोटात सापडला

मलेशियात एक धक्कादायक प्रकार घडला होता. बेपत्ता असलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह मगरीच्या पोटात सापडला होता. शेतकरी बपेत्ता होता. दरम्यान हा वक्ती मगरीच्या तावडीत सापडल्याचे काही लोकांनी पाहिले होते. यांनतर मगरीचे पोट फाडून या शेतकऱ्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता.