कोरोना नव्हे, आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी देशानं निवडला लॉकडाऊनचा पर्याय

सरकारने कर्मचाऱ्यांचे वर्किंग डेज म्हणजेच काम करण्याचे दिवस कमी करण्याचा प्लॅन तयार केला आहे.

Updated: May 24, 2022, 04:01 PM IST
कोरोना नव्हे, आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी देशानं निवडला लॉकडाऊनचा पर्याय title=

Pakistan Economic Crisis : श्रीलंकेनंतर पाकिस्तानमध्ये आर्थिक संकट उद्धभवले आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून पाकिस्तान आर्थिक संकटात असल्याची माहिती समोर आली. पाकिस्तानची आर्थिक स्थिती सुधारण्यापेक्षा दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. आर्थिक संकटातून उभारी घेण्यासाठी पाकिस्तान सरकार अनेक प्रयत्न करताना दिसतेय. यातील एक उदाहरण म्हणजे सरकारने कर्मचाऱ्यांचे वर्किंग डेज म्हणजेच काम करण्याचे दिवस कमी करण्याचा प्लॅन तयार केला आहे.

पाकिस्तानमध्ये भयंकर आर्थिक संकट -

पाकिस्तान सरकारने काम करण्याचे दिवस कमी करण्याच्या प्रस्तावावर सहमती दर्शवली आहे अशी माहिती सध्या आली आहे. या योजनेमुळे इंधन बचत होईल आणि विदेशी चलनाचा वापरही कमी प्रमाणात होईल, हे लक्ष्य समोर ठेवलं आहे.

एकीकडे पाकिस्तानमध्ये तेलाचा वापर वाढला असून दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पेट्रोल डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आर्थिक संकट ओढवल्याची माहिती समोर आली आहे.

पाकिस्तान सरकारचा नेमका प्लान काय?

कामाचे दिवस कमी केल्याने पेट्रोल डिझेलच्या योजनेने विदेशी चलनातील 2.7 अरब डॉलर वार्षिक बचत होऊ शकते. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने हा प्लॅन तयार केला आहे. त्यामुळे ऑफिस कर्मचाऱ्यांना 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी देण्याचा विचार मांडण्यात आला आहे. या योजनातून सरासरी पीओएल बचत दरमहा 12.2 कोटी अपेक्षित आहे. त्याचबरोबर कार्यदिवस कमी केल्याने तेलाचा वापर 90 टक्के कमी होतोय आणि सुट्ट्यांच्या दिवशी 10 टक्क्यांवर हा आकडा जातोय.

पाकिस्तान सरकार प्लान B आणि प्लान C ही तयार -

प्लान Aसोबतच स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने प्लान  B आणि प्लान C सुद्धा तयार केला आहे. प्लॅन B नुसार, 4 दिवस काम आणि 2 दिवस सुट्टी तर एक दिवस लॉकडाऊन करण्याचा प्लान सादर केला आहे. ज्यामुळे दर महिन्याला 17.5 कोटी डॉलर रुपयांची बचत होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर प्लान C नुसार 4 दिवस काम, 1 दिवस सुट्टी आणि 2 दिवस लॉकडाऊन असा तयार करण्यात आला आहे. या प्लानमुळे जवळपास वर्षाला 2.7 अरब डॉलर बचत होण्याचा अंदाज आहे.