समुद्रात सापडला हा Dragon सदृश जीव, तुम्हाला याची काही माहिती आहे का?

ही Chimaera म्हणजेच Cartilagious माशांची एक प्रजाती आहे. त्याला भूत शार्क (Ghost shark) देखील म्हणतात. रोमनने समुद्रात सापडलेल्या जीवाचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे

Updated: Apr 8, 2022, 12:48 PM IST
समुद्रात सापडला हा Dragon सदृश जीव, तुम्हाला याची काही माहिती आहे का? title=

फ्रान्स : एका रशियन मच्छिमाराला समुद्रात एक असा जीव सापडला आहे, जो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. सोशल मीडियावर या जीवाचा फोटो व्हायरल झाला असून लोक त्याला 'बेबी ड्रॅगन' म्हणत आहेत. 39 वर्षीय रोमन समुद्रात मासे पकडण्यासाठी निघाला होता, मात्र त्याच्या हीत लागले ते काही औरच होते. आपण चित्रातच पाहू शकता की, 'बेबी ड्रॅगन' ताज्या अंड्यातून बाहेर आल्यासारखे दिसते. सुरुवातीला याबद्दल कोणतीही माहिती नव्हती पण आता हळूहळू हे गूढ उकलत आहे.

ही Chimaera म्हणजेच Cartilagious माशांची एक प्रजाती असल्याचे सांगितले जात आहे. त्याला भूत शार्क (Ghost shark) देखील म्हणतात. रोमनने समुद्रात सापडलेल्या जीवाचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो इतका व्हायरल झाला की सगळ्यांना त्याबद्दल अनेकांना जाणून घ्यायचं होतं. या माशाचे डोळे मोठे, लांब शेपटी असून त्याचा रंग गुलाबी आहे. त्याच्या शरीरात पंखासारखे काहीतरी दिसत आहे. त्यामुळे त्याला बेबी ड्रॅगन म्हटले जात होते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हे पाहून लोक सोशल मीडियावर वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत. कुणाला आश्चर्य वाटले तर काही लोक असे आहेत ज्यांना त्याचा लूक पचनी पडत नाही. कारण प्रथमदर्शनी तुम्हाला समजणार नाही की ही काय चीज आहे?