अनेक वर्षांपासून समुद्रात भटकतंय हे शापित जहाज, रहस्य जाणून व्हाल थक्क!

जगभरात या जहाजाकडे रहस्यमयी जहाज म्हणून पाहिलं जातं.

Updated: Jul 21, 2022, 02:09 PM IST
अनेक वर्षांपासून समुद्रात भटकतंय हे शापित जहाज, रहस्य जाणून व्हाल थक्क! title=

न्यू यॉर्क : जगभर असंख्य रहस्यं दडलेली आहेत. यापैकी माणसाला काही गोष्टी कळल्या, पण अजूनपर्यंत माणसाला काही कळू शकलेलं नाही. आम्ही तुम्हाला अशाच एका रहस्याबद्दल सांगणार आहोत. जे जहाजाशी जोडलेलं आहे. फ्लाइंग डचमन शिप असं या जहाजाचं नाव आहे.

जगभरात या जहाजाकडे रहस्यमयी जहाज म्हणून पाहिलं जातं. या जहाजाबाबत अशी समजूत आहे की, गेल्या 400 वर्षांपासून शापित होऊन हे जहाज समुद्रात भटकतंय. या शापित जहाजाशी अनेक कथाही जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे ती नेहमीच चर्चेत राहते. इतकंच नाही तर हे जहाज पाहणं अत्यंत अशुभ मानलं जातं.

या शापित जहाजावर जगभरात अनेक टेलिव्हिजन शो आणि चित्रपटही बनवले गेलेत. यासोबतच अनेकांनी फ्लाइंग डचमन शिप पाहिल्याचा दावाही केला आहे. मात्र, त्यांच्या दाव्यात किती तथ्य आहे, हे कोणालाच कळू शकलं नाही. 
20 व्या शतकातील प्रसिद्ध लेखक "निकोलस मॉन्सेरेट" यांनी दुसर्‍या महायुद्धादरम्यान पॅसिफिक महासागरात पाहिल्याचा दावा केला होता. फ्लाइंग डचमन शिपबद्दलही विविध समजुती आहेत. 

असं म्हणतात की, 1641 मध्ये जहाजाचा कॅप्टन हेन्रिक वेन हॉलंडहून ईस्ट इंडीजच्या दिशेने निघाला होता. मात्र, प्रवासानंतर जेव्हा तो आपल्या प्रवाशांसह हॉलंडच्या दिशेने परत येऊ लागला तेव्हा त्याने वाटेत काही बदल केले. त्याने आपल्या जहाजाला कॅप ऑफ गुड हॉपकडे वळवलं. 

कॅप्टनच्या या निर्णयामुळे जहाजात बसलेले प्रवासी खूप नाराज झाले कारण त्यांना लवकर घरी पोहोचायचं होतं. पुढे जात असताना जहाजाला एका जोरदार वादळाचा सामना करावा लागला. या वादळात जहाज पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. या दुर्घटनेत सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. 

तेव्हापासून हे रहस्यमयी जहाज समुद्रात भटकत आहे. फ्लाइंग डचमन जहाजाचं रहस्य अद्याप उलगडलेलं नाही. हे जहाज पाहिल्याचा दावा केल्यानंतरही त्याचं गूढ कायम आहे कारण आजपर्यंत याबाबत ठोस पुरावे मिळालेले नाहीत.