पृथ्वीवर खरचं एलियन आहेत? अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने शेअर केलेल्या रहस्यमयी व्हिडिओमुळे खळबळ

अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने एक रहस्यमटी व्हिडिओ शेअर केला आहे. यात UFO आकाशात उडताना दिसत आहेत. 

वनिता कांबळे | Updated: Sep 11, 2023, 05:47 PM IST
पृथ्वीवर खरचं एलियन आहेत? अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने शेअर केलेल्या रहस्यमयी व्हिडिओमुळे खळबळ title=

Aliens News: एलियन हा नेमहीच चर्चेचा विषय असतो. एलियन्सच्या अस्तित्वबाबत आजवर अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले आहेत. मात्र, पृथ्वीवर खरचं एलियन आहेत असं सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.  एलियनच्या अस्तित्वाबाबत  अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने शेअर केलेल्या रहस्यमयी व्हिडिओमुळे खळबळ आहे. 

या ब्रम्हांडात पृथ्वीशिवाय अनेक ग्रह आहेत. या ग्रहावर जीवसृष्टी असू शकते. या ग्रहावर एलियन राहत असल्याचा दावा अनेकवेळा केला जातो.  अमेरिकेच्या सरकारकडे एलियन्स आणि परग्रहावरील इतर जीवांचे मृतदेह असल्याचा खळबळजनक दावा अमेरिकेच्या एका माजी गुप्तचर अधिका-याने केला होता. आता अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने एक रहस्यमयी व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या आधारे पृथ्वीवर एलियन अस्तित्वात असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

काय आहे या रहस्यमयी व्हिडिओमध्ये?

Tank zhou @IyLFQcsnb0eJNxt नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने हा UFO चा अर्थात उडत्या तबकडीचा व्हिडिओ कॅप्चर केल्याचा दावा आहे. या व्हिडिओ मध्ये एक UFO अति प्रचंड वेगाने आकाशात उडत असल्याचे दिसत आहे. हा UFO म्हणजे एलियनच्या अस्तित्वाचा मोठा पुरावा असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

एलियनच्या अस्तित्वाबाबत अमेरिकेचा धक्कादायक खुलासा

एलियनच्या अस्तित्वाबाबत अमेरिकेने यापूर्वी देखील अनेक खळबजनक दावे केले आहेत. जुलै 2023 मध्ये वॉशिंग्नटमध्ये हाऊस ओव्हरनाईट सब कमिटीच्या सुनावणीवेळी UFO चे काही व्हिडिओ दाखवण्यात आले होते. यावेळी हा व्हिडिओ दाखवण्यात आला होता. हा व्हिडिओ आता सोशल मिडियावर तुफना व्हायरल होत आहे. अमेरिकेच्या सरकारकडे एलियन्स आणि परग्रहावरील इतर जीवांचे मृतदेह असल्याचा खळबळजनक दावा या अधिका-यानं केलाय. डेविड ग्रुश असं या अधिका-याचं नाव आहे. अपघातग्रस्त यानातून हे मृतदेह सापडल्याचा दावाही डेव्हिड यांनी  केला होता. 

1947 मध्ये पहिल्यांदा चर्तेत आले एलियन

1947 मध्ये पहिल्यांदा  एलियन चर्तेत आले. अमेरिकेतील खाजगी वैमानिक केनेथ आर्नल्ड यांनी विमान चालवत असताना आकाशात एक अशी वस्तू पाहिली जी याआधी काहीधी पाहिली गेली नव्हती. यानंतर आकाशात अशा अनेक रहस्यमयी उडत्या तबडक्या दिसल्या. या उडत्या तबकड्यांना यूएफओ अर्थात अनआइडेंटिफाईड फ़्लाईंग ऑब्जेक्ट असे म्हंटले जाते.  अमेरिकेत एरिया 51 नावाचे एक रहस्यमयी ठिकाण आहे. जिथे मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे UFO दिसतात. येथे सर्वसामान्यांना प्रवेश बंदी आहे.