Recession च्या सावटाखाली 2023! ब्रिटन, अमेरिकापाठोपाठ भारताचीही चिंता वाढणार?

World Recession 2023: गेल्या अनेक दिवसांपासून आपण ऐकत असूनच की जागतिक मंदीचं वातावरण (recession) सध्या सगळीकडेच खुणावतं आहे. त्यामुळे सध्या आपल्या सर्वांनाच आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जगाची महासत्ता असणाऱ्या अमेरिकेत (world economy) सध्या आर्थिक परिणाम सगळ्यात वाईट आहेत.

Updated: Dec 16, 2022, 12:35 PM IST
Recession च्या सावटाखाली 2023! ब्रिटन, अमेरिकापाठोपाठ भारताचीही चिंता वाढणार?  title=
recession news

World Recession 2023: गेल्या अनेक दिवसांपासून आपण ऐकत असूनच की जागतिक मंदीचं वातावरण (recession) सध्या सगळीकडेच खुणावतं आहे. त्यामुळे सध्या आपल्या सर्वांनाच आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जगाची महासत्ता असणाऱ्या अमेरिकेत (world economy) सध्या आर्थिक परिणाम सगळ्यात वाईट आहेत. त्यामुळे तिथल्या मंदीचा जागतिक बाजारातही परिणाम होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षात ब्रिटनचीही आर्थिक घडी कोलमडून गेली होती. त्यामुळे तिथल्या आर्थिक घडामोडींच्या सुधारणांसाठी धोरणं आखणं हे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासमोरील आव्हानं आहे. ते जेव्हा अर्थतज्ञ होते तेव्हा त्यांनी ब्रिटनची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मोलाचे योगदान दिले होते. परंतु आता ब्रिटन आणि अमेरिकेपाठापोठ (america recession) भारतासह जगातील अन्य देशांनाही जागतिक मंदीची चिंता सतावते आहे. (The threat of recession in 2023 will increase India's concern after Britain and the United States Marathi News)

गेल्या महिन्यात ब्रिटननं मंदीची घोषणा केली होती. आता या मंदीनं अमेरिकेलाही हैराण करून सोडलं आहे. अमेरिकन शेअर बाजारात सध्या कोलमडलं आहे. त्यातून नोव्हेंबर महिन्यात किरकोळ विक्रीचे आकडे अपक्षेपेक्षा जास्त घसरले होते. त्यातून काल अमेरिकेच्या शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड झाली. याचा परिणाम आता मोठ्या प्रमाणात मंदीच्या स्वरूपात दिसून येण्याची भिती आहे. 

हेही वाचा - लो बजेटमध्ये गोव्याचा फिल... 'हे' डेस्टिनेशन आहे Honeymoon साठी एकदम फिट!

 

भारतातील महागाई

मागच्याच आठवड्यात रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं (RBI) आपल्या व्याजदरात मोठी वाढ केली आहे. त्यातून भारतात अद्यापही महागाईचे वातावरण आहे. फेडरल रिझर्व्ह यांनीही त्यांच्या व्याजदरात सातत्यानं वाढ केली असून भारतातही आरबीआयनं व्याजदारात तीन-चार वेळा वाढ केल्याचे दिसून आले आहे. हा व्याजदर 4.25 ते 4.50 च्या टक्क्यापर्यंत पोहचला आहे. हा व्याजदर गेल्या 15 वर्षातला सर्वात जास्त व्याजदर आहे. 

काय सांगतात आकाडे? 

अमेरिकन शेअर मार्कटटा डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेजसाठी या वर्षीच्या तिमाहीतील सप्टेंबर या महिन्याचा गुरूवात हा सर्वात वाईट ठरला आहे. डाऊ जोन्स (Dow Jones Industrial Average) 764.13 अंकांनी घसरून 33,202.22 वर आला. एस अॅन्ड पी 500 (S&P 500) 2.49 टक्‍क्‍यांनी घसरून 3,895.75 वर आला. नास्डाक कॉम्पोझिट (Nasdaq Composite) 3.23 टक्क्यांनी घसरून 10,810.53 वर आला. एपल अल्फाबेट (Apple Alphabet) चे शेअर्स 4 टक्क्यांनी घसरले. अॅमेझॉन (Amazon) आणि मायक्रोसॉफ्टच्या (microsoft) समभागांमध्ये 3 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. नेटफ्लिक्सचे शेअर्स 8.6 टक्क्यांपर्यंत घसरले.