Video: काही सेकंदात अजगरानं शिकार केली फस्त! व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Dangerous Python Hunting Viral Video:  वन्यप्राण्यांच्या जगाबाबत कायमच कुतुहूल राहिलं आहे. त्यांची शिकार करण्याची पद्धत आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलं आहे. जीवनचक्र चालवण्यासाठी प्रत्येक प्राणी एकमेकांवर अवलंबून आहे असाच एका अजगराचा व्हिडीओ (Python Video) नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 

Updated: Nov 2, 2022, 04:03 PM IST
Video: काही सेकंदात अजगरानं शिकार केली फस्त! व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल title=

Dangerous Python Hunting Viral Video:  वन्यप्राण्यांच्या जगाबाबत कायमच कुतुहूल राहिलं आहे. त्यांची शिकार करण्याची पद्धत आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलं आहे. जीवनचक्र चालवण्यासाठी प्रत्येक प्राणी एकमेकांवर अवलंबून आहे असाच एका अजगराचा व्हिडीओ (Python Video) नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओत एक अजगर हरणाला गिळताना दिसत आहे. काही सेकंदात हरण अजगराच्या पोटात दिसतो. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर करण्यात आलं आहे.  beautiful_new_pix वर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. मात्र हा व्हिडीओ नेमका कुठचा आहे? याबाबत उल्लेख करण्यात आला आहे. एका आठवड्यापूर्वी अपलोड केलेला हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आहे. 

अजगर आपल्या सावजाभोवती वेटोळे घालतं आणि मग पूर्ण गिळून टाकतो. शिकार मोठी असली तरी अजगर आपल्या पोटात आरामात घालतं. व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही असंच म्हणाला. अजगर हरणाला काही सेकंदात गिळतो. नॅशनल जिओग्राफिकच्या मते, बर्मीज जातीचा अजगर मांसाहारी आहे. हरण, मगर आणि बकऱ्यांना आपलं सावज करतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओखाली युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका युजर्सनं लिहिलं आहे की, हा रिव्हर्स व्हिडीओ आहे, इतकं जलद गतीने अजगर गिळूच शकत नाही. दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, म्हणून मला सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती वाटते.