सुदानमध्ये सैनिकांशी शरीरसंबंध ठेवण्यासाठी महिला लावत आहेत रांग, कारण संतापजनक; जगभरात खळबळ

गतवर्षी 15 एप्रिलपासून सुरू झालेल्या संघर्षाच्या काही दिवसांतच सशस्त्र जवानांकडून बलात्कार झाल्याच्या बातम्या समोर आल्या. युद्धाने ग्रासलेल्या सुदानमध्ये महिलांना कुटुंबीयांना अन्न मिळवण्यासाठी सैनिकांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडलं जात आहे  

शिवराज यादव | Updated: Jul 22, 2024, 03:54 PM IST
सुदानमध्ये सैनिकांशी शरीरसंबंध ठेवण्यासाठी महिला लावत आहेत रांग, कारण संतापजनक; जगभरात खळबळ title=

युद्धाने ग्रासलेल्या सुदानमध्ये महिलांना कुटुंबीयांना अन्न मिळवण्यासाठी सैनिकांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडलं जात आहे. 'द गार्डियन'ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. सुदानच्या ओमदुरमन शहरातून पळून गेलेल्या दोन डझनहून अधिक महिलांनी सांगितलं आहे की, सैनिकांसोबत शरीरसंबंध ठेवणं हा अन्न किंवा वस्तू विकत घेण्याचा एकमेव मार्ग आहे ज्याच्या आधारे कुटुंबाचे पोट भरण्यासाठी पैसे मिळवू शकतात.

'द गार्डियन'शी संवाद साधलेल्या एका महिलेने सांगितलं की, शहरातील फॅक्ट्रीमध्ये हा सगळा प्रकार सुरु आहे. येथेच सर्व धान्य आणि अन्न साठवण्यात आलं आहे. "माझे आई-वडील फार वयस्कर असून आजारीही आहेत. मी माझ्या मुलीला अन्नाच्या शोधात कधीच बाहेर पाठवत नाही. मीच सैनिकांकडे गेले आणि तो अन्न मिळवण्याचा एकमेव मार्ग होता. फॅक्टरी परिसरात ते सगळीकडे होते," असा धक्कादायक अनुभव महिलेने सांगितला. महिलेला गतवर्षी मे महिन्यात मांस प्रक्रिया कारखान्यात सैनिकांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्यात आलं होतं. 

देशात गृहयुद्ध सुरू झाल्यानंतर लगेचच हा प्रकार सुरु झाला होता. देशात लष्कर आणि निमलष्करी रॅपिड सपोर्ट फोर्स यांच्यात युद्ध पेटलं आहे. 15 एप्रिलपासून सुरू झालेल्या संघर्षाच्या काही दिवसांतच सशस्त्र सैनिकांकडून बलात्कार झाल्याच्या बातम्या समोर आल्या.

सुदानमधील युद्धात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. काही अंदाजानुसार मृतांची संख्या 150,000 इतकी आहे. युद्धामुळे जगात विस्थापन संकट निर्माण झालं असून 11 मिलियनहून अधिक जणांवर देश सोडण्याची वेळ आली आहे. तसंच दश दुष्काळाच्या उंबरठ्यावर आला आहे. 

अनेक महिलांनी आरएसएफच्या सैनिकांनी त्यांच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या भागात कशाप्रकारे पद्धतशीर रितीने लैंगिक शोषण केलं याचा खुलासा केला आहे. महिलांनी गार्डियनला सांगितलं की, रिकाम्या घरांमध्ये प्रवेश हवा असल्यास सैनिक सेक्सची मागणी करत आहेत. या घरांमध्ये काही वस्तू सापडण्याची शक्यता असते, ज्या स्थानिक बाजारात विकल्या जाऊ शकतात. 

एका महिलेने सांगितलं की, सैनिकांसह सेक्स केल्यानंतर तिला रिकाम्या घरातून अन्न, किचनचं सामान आणि परफ्यूम नेण्याची परवानगी देण्यात आली. "मला ज्या यातना भोगाव्या लागल्या ते शब्दांत सांगू शकत नाही. माझ्या शत्रूसोबतही असं होऊ नये. मला माझ्या मुलांचं पोटं भरायचं असल्याने मी ते केलं," असं महिला म्हणाली.

शहरातील नागरिकांनी दावा केला आहे की, सैनिक रिकाम्या पडलेल्या घरांमध्ये महिलांना आणत आहेत. तिथे त्यांना रांग लावायला सांगितली जाते आणि नंतर त्यातून ते निवड करतात. आमच्या शेजारच्या घरांमध्ये अनेक महिला येतात आणि रांग लावतात. मला अनेकदा त्यांच्या किंचाळण्याचा आवाज येतो. पण मी काय करु शकतो?

दुसऱ्या एका महिलेने गार्डियनला सांगितलं की, एकदा तिने सैनिकासोबत लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी तिचा छळ केला आणि तिचे पाय जाळले. 21 वर्षीय तरुणीने सांगितले की, तिने अन्न आणि वस्तूंसाठी घरे लुटण्याची परवानगी देण्याच्या बदल्यात सैनिकांसोबत लैंगिक संबंध ठेवले होते. परंतु पुन्हा जेव्हा तिने असं करण्यास नकार दिला तेव्हा सैनिकांनी तिचे पाय जाळले.

एका सैनिकाने मात्र हे आरोप, दावे खोटे असल्याचं म्हटलं आहे. त्याने आपण कधीही कोणत्या महिलेचा छळ केला नसल्याचा दावा केला आहे. “हे भयानक आहे. या शहरातील पाप इतकं आहे की ते कधीही माफ होऊ शकत नाही,” असं तो म्हणाला.

Tags: