Ozone Layer is HEALING : ग्लोबल वार्मिंग ही जागतिक समस्या बनली आहे. याचा थेट परिणाम ओझोनच्या थरावर होत आहे. पृथ्वीचे सुरक्षा कवच असणारा ओझोनचा थर कमी होत आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे हे होत आहे. यामुळे पृथ्वीला धोका निर्माण झाला आहे. ग्लोबल वार्मिंगच्या समस्येमुळे जगभरात वाद विवाद होत आहेत. तर, अनेक संशोधक या समस्येवर उपाय शोधत आहेत. मात्र, ग्लोबल वार्मिंगवर निसर्गानेच जबरदस्त तोडगा काढला आहे. पृथ्वीला असलेला सर्वात मोठा धोका 2045 नंतर टळणार आहे. संशोधकांनी हा खुलासा केला आहे.
पृथ्वीसाठी ओझोन ऑक्सिजनइतकाच महत्त्वाचा आहे. ओझोनचा थर हा सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक किरणांपासून लोकांचे रक्षण करते. 1970 मध्ये ओझोन थरामध्ये छिद्रे तयार होऊ लागल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले. पृथ्वीवर सजीवाच्या अस्तित्वासाठी ओझोनचा थर अत्यंत महत्त्वाचा आहे. पृथ्वीच्या वातावरणाभोवती असलेल्या एका थराला ओझोन थर म्हणतात. ओझोनचा थर सूर्याकडून येणाऱ्या अल्ट्राव्हायोलेट किरणांना पृथ्वीवर येण्यापासून रोखते. या हानिकारक किरणांमुळे होणाऱ्या समस्यांपासूनही बचाव करते. ओझोन थर हा ऑक्सिजनच्या (O3) तीन अणूंनी बनलेला वायू आहे. फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ फॅब्रि चार्ल्स आणि हेन्री बुसन यांनी 1913 मध्ये ओझोन थराचा शोध लावला होता.
सूर्याकडून येणार्या अतिनील किरणांना रोखणारा ओझोन थर आता जगभरातील वणव्याच्या धुरामुळे (Smoke of Wildfires) धोक्यात आल्याचा दावा काही संशोधकांनी केला आहे. या धुरामुळे आता ओझोनचा थर खराब होऊ लागला आहे. 2019 आणि 2020 मध्ये, ऑस्ट्रेलियातील (Australia) जंगलातील आगीपासून (Wildfire) निघणाऱ्या धुरामुळे दक्षिण गोलार्धातील वातावरणातील ओझोन काही महिन्यांसाठी नष्ट झाला होता. ओझोनचा थर (Ozone Layer) पृथ्वीच्या वातावरणात (Atmosphere) स्ट्रॅटोस्फियरच्या सुरुवातीला आणि ट्रोपोस्फियरच्या अगदी वर असतो. येथे असलेला ओझोन सूर्यापासून येणारे अतिनील किरण शोषून घेतो. त्यामुळे हे हानिकारक किरण पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचत नाहीत. अतिनील किरणे पृथ्वीवरील जीवनासाठी अत्यंत हानिकारक आहे. याच कारणामुळे ओझोन थर देखील जीवन-रक्षक कवच मानला जातो.
ओझोन थर सुधारण्यासाठी जगभरातील संशोधक प्रयत्न करत आहेत. अशातच या समस्येवर निसर्गानेच तोडगा काढल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. नैसर्गिक रित्या ओझोनचा थर सुधारत असून 2045 पर्यंत साची स्थिती पूर्वपदावर येईल असा निष्कर्ष एका संशोधनातुन समोर आला आहे.