Donald Trump यांना अटक होण्याची शक्यता! पॉर्न अभिनेत्रीमुळे माजी राष्ट्राध्यक्ष अडचणीत

Donald Trump Hush Money Case: मागील अनेक दिवसांपासून अमेरिकेमध्ये हे प्रकरण गाजत असून या प्रकरणामध्ये आता पॉर्न अभिनेत्रीने केलेल्या आरोपांवरुन माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना थेट अटक होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

Updated: Mar 21, 2023, 05:45 PM IST
Donald Trump यांना अटक होण्याची शक्यता! पॉर्न अभिनेत्रीमुळे माजी राष्ट्राध्यक्ष अडचणीत title=
Stormy Daniels And Donald Trump

Trump Hush Money Case: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याविरोधात एका पॉर्न अभिनेत्रीने (Porn Actress) केलेल्या आरोपांप्रकरणी आज अमेरिकेत मोठी राजकीय घडामोड घडण्याची दाट शक्यता आहे. या पॉर्न अभिनेत्रीनं ट्रम्प यांनी आपलं देयक थकवल्याचा आरोप केल्यानंतर ट्रम्प यांच्याविरोधात ऐतिहासिक अभियोग खटल्याची शक्यता असतानाच न्यूयॉर्क पोलिसांनी शहरातील सुरक्षा वाढवली आहे. माजी राष्ट्रध्यक्षांनी आपल्या समर्थकांना आवाहन करताना मला अपमानित केलं जात असून याविरोधात रस्त्यावर उतरावे असं म्हटलं होतं. सोमवारी सायंकाळी न्यूयॉर्कमध्ये मोजक्या ट्रम्प समर्थकांनी आपल्या नेत्याच्या आवाहनाला साद देत रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं. हे संपूर्ण प्रकरण 2016 साली पॉर्न अभिनेत्री स्टॉर्मी डेनियल्सने (Stormy Daniels) ट्रम्प यांनी आपले पैसे थकवल्याचा आरोप केला होता.

ट्रम्प यांचा दावा

जर ट्रम्प यांच्याविरोधात अभियोग दाखल करण्यात आला तर ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले असे माजी राष्ट्राध्यक्ष असतील त्यांच्याविरोधात असा खटला चालवला जाईल. हा खटला दाखल केल्यास 2024 मध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणूक लढवण्याच्या त्यांच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण होईल. दरम्यान, ट्रम्प यांनी स्वत: आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये मंगळवारी मला अटक करेली जाईल असा दावा केला आहे. मॅनहॅटनमधील अभियोजकांनी मला 'हश मनी' प्रकरणामध्ये आरोपी म्हणून निर्देशित करणार आहेत, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

..तर ट्रम्प ठरणार गुन्हा दाखल झालेले पहिले राष्ट्राध्यक्ष

हे संपूर्ण प्रकरण पॉर्न चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री स्टार्मी डेनियल्सने केलेल्या आरोपांसंदर्भातील आहे. ट्रम्प आणि स्टार्मी यांचे प्रमे संबंध होते. हे संबंध लपवण्यासाठी त्यांनी 2016 साली डेनियल्स यांना 1 लाख 30 हजार डॉलर्सची रक्कम दिली होती. या प्रकरणामध्ये ट्रम्प यांच्यावर आरोप लावले जावेत की नाही याबद्दल सध्या विचार केला जात आहे. जर मॅनहॅटन जिल्हा अटॉर्नींनी माजी राष्ट्राध्यक्षांना दोषी ठरवलं तर असे आरोप लावण्यात आलेले ट्रम्प हे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरतील. 

ट्रम्प यांना सरेंडर करावं लागणार

ट्रम्प यांच्या वकिलांनी शुक्रवारी सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार, मॅनहॅटन ग्रॅण्ड ज्युरीने ट्रम्प यांना दोषी ठरवल्यास त्यांना पुढील सुनावणीच्या आधी आत्मसमर्पण करावं लागेल. ट्रम्प यांनी स्टार्मीबरोबर आपले संबंध असल्याचा दावा खोडून काढला आहे. ट्रम्प यांनी मागील वर्षीच पुन्हा एकदा आपण राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळेच आता ते पुन्हा या प्रकरणामुळे चर्चेत आल्याने ते यात अडकले तर त्यांचं हे निवडणूक लढवण्याचं स्वप्न अपूर्ण राहू शकतं.