काबुल : अफगाणिस्तानमध्ये रिपोर्टींगसाठी गेलेल्या आमच्या सह्योगी चॅनेल WION चे रिपोर्टर अनस मलिकवर प्राणघातक हल्ला झाल्याची दुदैवी घटना घडलीय. या घटनेत अनस मलिक आणि त्यांच्या टीमला गाडीतून बाहेर काढून जमिनीवर ओढण्यात आलं आणि त्यानंतर संपूर्ण टीमला बेदम मारहाण केल्याची घटना घडलीय. या घटनेमुळे तालिबानची क्रुरता अजूनही सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
तालिबान सरकारच्या वर्षपुर्ती प्रकरणाचे कव्हरेज करण्यासाठी WION चे रिपोर्टर अनस मलिक बुधवारी संध्याकाळी काबूलला पोहोचले होतो. गुरूवारी अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारच्या वर्षपुर्ती निमित्त कव्हरेज करताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. त्याच्या टीमला गाडीतून बाहेर काढून जमिनीवर ओढण्यात आलं आणि त्यानंतर तालिबानी लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर त्यांना तेथून तालिबान्यांच्या गुप्तचर युनिटमध्ये नेत २४ तास हातात हातकड्या, डोळ्यावर पट्टी अशी आरोपी सारखी वागणूक देण्यात आली.
रिपोर्टींगची परवानगी असून सुद्धा...
अनस म्हणाले की,आम्ही कव्हरेजसाठी सर्व परवानग्या घेतल्या होत्या. आमच्याकडे सर्व प्रेस क्रेडेंशियल्स होती. आम्ही फक्त सामान्य दृश्ये कव्हर करत होतो. त्यानंतर आम्हाला पकडण्यात आले, कारमधून बाहेर काढत आमचे फोन ताब्यात घेतले गेले. त्यांच्यानंतर आमच्या टीमवर हल्ला करण्यात आला.
अनस पुढे म्हणाले, "काही वेळानंतर आम्हाला तेथून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले. ते अफगाणिस्तानमधील तालिबानी गुप्तचर युनिट होते. आमच्या हातात बेड्या बांधण्यात आल्या, डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली आणि आरोपींसाऱखी आमची चौकशी करण्यात आल्याची क्रुर छळाची आपबिती अनसने सांगितले आहे.
दरम्यान सध्या अनस आणि त्यांची संपुर्ण टीम काबूलमध्ये सुखरूप असल्याची माहीती आहे.