काबूल : Afghanistan latest news as Taliban : तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) आपला कब्जा मिळविण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. (Taliban situation in Afghanistan) एक एक शहर ताब्यात घेत राजधानी काबूल शहरालाच वेढा घातला आहे. तालिबान बंडखोरांनी कूच सुरुच ठेवली आहे. तालिबान जवळ पोहोचात तेथे मोठी धुमश्चक्री सुरु झाली आहे. शुक्रवारी तालिबानने अफगाणिस्तानमध्ये घुसखोरी करत दक्षिण अफगाणिस्तानातील कंदाहार, हेल्मंडसह आणखी चार शहरे ताब्यात घेतली. (Taliban situation in Afghanistan)
तालिबानी सैन्य राजधानी काबूलकडे वाटचाल करीत आहे. काही दिवसांमध्ये तालिबान राजधानीचे शहर काबूलही ताब्यात घेईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्याचवेळी अफगाणिस्तानमध्ये सरकारी लष्करी दल आणि बंडखोर तालिबानमध्ये संघर्ष सुरुच आहे. दरम्यान, कंदाहारवर तालिबानने ताबा मिळवल्याच्या वृत्ताला सरकारी अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.
आतापर्यंत हेरात या दुसऱ्या क्रमांकाच्या आणि कंदाहार या तिसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या शहरांसह 34 प्रांतांपैकी 18 प्रांतांतील शहरे ताब्यात घेतली आहेत. आता अफगाणिस्तानच्या दोन -तृतीयांश भागावर तालिबानी सैन्याने नियंत्रण मिळवले आहे. त्याचवेळी तालिबानने राजधानी काबूललाही वेढा दिल्याने अफगाणिस्तानच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे तालिबानकडून अफगाणिस्तान पाडाव होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.