ताज महाल दुसऱ्या क्रमांकावर !

एका सर्वेनुसार जगप्रसिद्ध ताज महाल हे संपूर्ण जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Updated: Dec 8, 2017, 04:09 PM IST
ताज महाल दुसऱ्या क्रमांकावर ! title=

नवी दिल्ली : एका सर्वेनुसार जगप्रसिद्ध ताज महाल हे संपूर्ण जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

ऑनलाइन सर्वे

युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक वारसा स्थळांची पर्यटकांनी दिलेल्या पसंतीनुसार क्रमवारी करण्यात आली. हा सर्वे एक ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल, ट्रिपअॅडव्हाईजर केला आहे.

80 लाख पर्यटकांची भेट

ताज महालला दरवर्षी 80 लाख पर्यटक भेट देतात. प्रेमाचं प्रतीक असलेला ताज महाल जगभरातल्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर कंबोडीयातील अंकोर वाट हे मंदिर आहे.

इतर जागतिक वारसा स्थळं

इतर जागतिक वारसा स्थळांमध्ये चीनची भिंत, पेरूतील माचू पिचू, ब्राझिलमधील इगुआझू नॅशनल पार्क, इटलीतील सॅसी ऑफ मातेरा, ऑशवित्ज बिरकेनाऊ, इस्त्रायलमधील जेरूसलेम, तुर्कस्थानातील इस्तंबूल या सर्वांचा या यादीत समावेश आहे.