चीनी हवाई दलाची सीमाभागात घुसखोरी, या छोट्या देशाने ही दाखवला मग इंगा

चीनने तैवानच्या हवाई क्षेत्रात दोन टप्प्यांत केलेली ही सर्वात मोठी घुसखोरी होती.

Updated: Oct 2, 2021, 07:16 PM IST
चीनी हवाई दलाची सीमाभागात घुसखोरी, या छोट्या देशाने ही दाखवला मग इंगा title=

नवी दिल्ली : तैवानच्या संरक्षण क्षेत्रात प्रवेश केल्याने तैवान सरकारने चीन विरुद्ध तीव्र संताप व्यक्त केलाय. राष्ट्रीय दिनी ताकद दाखवत चीनने शुक्रवार आणि शनिवारी तैवानच्या हवाई संरक्षण सीमेवर 38 लढाऊ विमाने पाठवली. चीनने दोन टप्प्यांत केलेली ही सर्वात मोठी घुसखोरी होती.

प्रत्युत्तरादाखल तैवानच्या हवाई दलानेही कारवाई केली. चीनला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी त्याने आपली लढाऊ विमाने पाठवली. चीन गेल्या दीड वर्षांपासून तैवान सीमेजवळ हवेत सतत घुसखोरी करत आहे. तैवानचे पंतप्रधान सु तेंग-चेंग शनिवारी सकाळी म्हणाले की, चीन मुद्दाम लष्करी आक्रमणामध्ये गुंतत आहे आणि प्रादेशिक शांततेला हानी पोहोचवत आहे.

चीनची ही लढाऊ विमाने अनेकदा तैवानच्या नियंत्रणाखाली असलेल्या प्रतास बेटांच्या हवाई संरक्षण क्षेत्राजवळून जातात. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, चीनने 18 J-16s, चार सुखोई -30 विमाने आणि दोन H-6 बॉम्बर्स आण्विक बॉम्ब टाकण्यास सक्षम असलेली विमानं पाठवले होते. याशिवाय चीनच्या ताफ्यात पाणबुडीविरोधी विमानाचाही समावेश होता. प्रत्युत्तरादाखल तैवाननेही आपली लढाऊ विमाने चालवली.

तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, यानंतर शनिवारी सकाळी चीनची 13 लढाऊ विमाने पुन्हा एकदा तैवानच्या हवाई संरक्षण क्षेत्रातून गेली. त्यात 10 जे -16, 2 एच -6 बॉम्बर्स विमानांचाही समावेश होता. तैवानच्या लढाऊ विमानांनी चिनी विमानांना इशारा दिला आहे, तर चिनी विमानांवर लक्ष ठेवण्यासाठी क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आली आहेत.

चिनी विमानांचे पहिले युनिट प्रतास बेटांजवळून गेले. दुसरे युनिट बाशी चॅनेलमधून गेले जे तैवानला फिलिपिन्सपासून वेगळे करते. हे प्रशांत महासागर आणि वादग्रस्त दक्षिण चीन समुद्राला जोडते. चीनने यावर कोणतेही विधान केलेले नाही.

यापूर्वी चीनने म्हटले होते की, या लढाऊ विमानांचे उड्डाण हे देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आहे. यापूर्वी जून महिन्यात चीनने एकाच वेळी 28 विमाने पाठवून आपली ताकद दाखवली होती. तैवानला त्याचे सार्वभौमत्व स्वीकारण्यासाठी चीनने लष्करी आणि राजकीय दबाव वाढवला आहे.