रिकाम्या बाटल्यांच्या आधारे पोहत आला दुसऱ्या देशात, म्हणाला-मरुन जाईल पण परतणार नाही

मुलगा स्पेन-मोरक्को सीमेवरुन उत्तर आफ्रिका क्षेत्रातील सेउटा येथे पोहोचला.

Updated: May 24, 2021, 11:09 AM IST
रिकाम्या बाटल्यांच्या आधारे पोहत आला दुसऱ्या देशात, म्हणाला-मरुन जाईल पण परतणार नाही title=

मुंबई : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुण मुलगा प्लास्टिक बाटल्यांच्या मदतीने समुद्रात पोहत असताना दिसत आहे. हा व्हिडिओ खूपच भावूक आहे. जेव्हा हा व्हिडिओ कुठला आहे याचा तपास केला गेला तेव्हा हा मुलगा स्पेन-मोरक्को सीमेवरुन उत्तर आफ्रिका क्षेत्रातील सेउटा येथे पोहोचला. हा मुलगा कसंतरी किनाऱ्यावर पोहोचला आणि भीतीवरुन उडी मारुन शहरात प्रवेश करु लागला तर सैनिकांनी त्याला रोखलं.

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार स्पॅनिश सैनिकांनी जेव्हा त्याला ताब्यात घेतलं तेव्हा तो म्हणाला की, मी परत जाणार नाही. माझं मोरक्को मध्ये कोणीच नाही. मी परत जाण्यापेक्षा थंडीने मरणं पसंत करेल. यानंतर सैनिकाने म्हटलं की, मी कधी कोणत्या तरुणाला असं बोलताना नाही पाहिलं.'

मोरक्को ते सेउटा दरम्यान उत्तर आफ्रिकेच्या एन्क्लेवमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी स्पेनमध्ये प्रवेश करत आहेत. त्यांना रोखण्यासाठी स्पेनने सीमेवर सैन्य तैनात केले आहेत. सैनिकांना बॉर्डरवर तैनात केल्याने आता लोकांना सीमेवरुन प्रवेश करता येत नाहीये. 8,000 लोकं आतापर्यंत मोरक्को येथून एन्क्लेवला पोहोचले आहेत.

स्पेन सरकारच्या माहितीनुसार, या प्रवाशांमदध्ये किशोर वयाचे मुले आहेत. पण स्पेनने अनेक लोकांना माघारी पाठवलं आहे. स्पेनचे पंतप्रधान प्रेडो सांचेज यांनी कायदा व सुव्यस्था राखण्याचे आदेश दिले आहेत. एन्क्लेवमध्ये जवळपास 80,000 नागरिक आहेत. समुद्राच्या मार्गाने ते स्पेनमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही जण पुन्हा मोरक्कोला परतले आहेत. तर काही लोकांना सैनिक माघारी पाठवत आहेत. (फोटो : Reuters)