सुनीता विलियम्स पृथ्वीवर कधी आणि कशा परतणार? NASA कडून मोठी अपडेट

Sunita williams Helth Update: अंतराळ यानाच्या रिएन्ट्रीमध्ये गडबड झाली तर मोठी जोखीम पत्करावी लागू शकते. थ्रस्टर खराब झाला तर स्टारलायनर अंतराळात अडकू शकतो.

Pravin Dabholkar | Updated: Aug 24, 2024, 09:25 AM IST
सुनीता विलियम्स पृथ्वीवर कधी आणि कशा परतणार? NASA कडून मोठी अपडेट  title=
सुनिता विलियम्सना पृथ्वीवर वाचवण्यासाठी NASA कडे काय प्लान?

Sunita williams Helth Update: अमेरिकी अंतराळ संस्था नासाची अंतरळा यात्री सुनिता विलियम्स स्पेसमध्ये अडकल्या आहेत. त्या आपले सहकारी बुच विल्मोर यांच्यासह बोइंग स्टारलायनरमधून अंतराळात गेल्या होत्या. त्यांनी 5 जूनला अंतराळासाठी उड्डाण घेतले.8 दिवसानंतर त्यांनी स्पेसमधून येणं अपेक्षित होतं. पण 2 महिने झाले तरी त्या न परतल्याने आता चिंता वाढू लागली आहे.बोईंग स्टारलायन अंतराळ यानामध्ये हीलियम लीक आणि थ्रस्टरमध्ये अडचणी आल्या. स्टारलायनरमधून त्या परतल्या तर त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. अमेरिकी सैन्य अंतराळ प्रणालीचे माजी कमांडर रुडी रिडोल्फी यांनी वायुमंडळ पुन: प्रवेशाच्या जोखमींवर प्रकाश टाकलाय. 

 96 तासांचा ऑक्सिजन 

अंतराळ यानाच्या रिएन्ट्रीमध्ये गडबड झाली तर मोठी जोखीम पत्करावी लागू शकते. थ्रस्टर खराब झाला तर स्टारलायनर अंतराळात अडकू शकतो. आता अंतराळयात्रींकडे केवळ 96 तासांचा ऑक्सिजन राहीलाय. पुन:प्रवेशावेळी चुकीच्या संरेखणमुळे कॅप्सूल वायुमंडळात उसळून कक्षेत राहू शकतो. चुकीचा कोन असल्याने स्टारलायनरल जळण्याचीदेखील शक्यता आहे. यात अंतराळ प्रवाशांच्या जीवाला धोका असल्याचे रुडी यांनी सांगितले. 

नासा घेणार मिटींग 

अमेरिकीची अंतराळ एजन्सी नॅशनल एरोनॉटिक्स अॅण्ड स्पेस एडमिनिस्ट्रेशन म्हणजे नासा या आठवड्यात महत्वपूर्ण निर्णय घेणार आहे. बोईंगचे नवे कॅप्सूल आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) मधून सुनीता विलियम्स यांच्यासह 2 अंतराळवीरांना आणण्यासाठी सुरक्षित आहे की नाही? हे पाहिले जाणार आहे. नासा प्रशासक बिल नेल्सन आणि इतर टॉपचे अधिकारी मिळून आज (शनिवार) बैठक घेणार आहेत. यानंतर यांदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे. 

2025 पर्यंत राहावे लागेल?

अंतराळ यात्री सुनिता विलियम्स आणि बुच विल्मोर यांनी 4 जून ला बोईंगच्या स्टारलायनहून अंतराळात उड्डाण घेतले होते. या परिक्षणावेळी त्यांच्या थ्रस्टरमध्ये खराबी आली.हेलियम गळतीमुळे नासाने कॅप्सून स्थानकावर उभे केले. पुढे काय करायला हवे? यावर इंजिनीअर्स विचार करत आहेत. स्पेसएक्स अंतराळ यात्रींना पुन्हा पृथ्वीवर आणू शकतो पण यासाठी त्यांना पुढच्या फेब्रुवारीपर्यंत तिथेच रहावे लागेल. स्टेशनवर पोहोचल्याच्या 1 ते 2 आठवड्यानंतर त्यांनी परतणे अपेक्षित होते.नासाने हा निर्णय घेतला तर स्पेसएक्सने अंतराळ यात्री परत आणण्याचा मार्ग योग्य ठरु शकतो. असे झाल्यास स्टारलायनर सप्टेंबरमध्ये पृथ्वीवर रिकामी परतू शकतो. 

जमिनीवर होतेय टेस्टिंग 

इंजिनीअर स्टारलायनर थ्रस्टरसाठी एक नवे कॉम्प्यूटर मॉडेलचे आकलन करत आहेत. अंतिम निर्णय घेतना प्रत्येक प्रकारच्या जोखमीचे विश्लेषण केले जाईल. स्टारलायनर अंतराळ यात्रींना सुरक्षित आणण्यास सक्षम आहे की नाही हे थ्रस्टरच्या व्यापक परिक्षणामुळे कळू शकेल, हे बोईंगने या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते. हे बोईंगचे पहिले परीक्षण उड्डाण होते, ज्यामध्ये चालक दल देखील होते.स्पेस शटल सेवेतून हटल्यानंतर नासाने अंतराळ यात्रींच्या अंतराळ स्थानकातील येजा करण्याचे काम बोईंग आणि स्पेसएक्सवर सोपावल आहे. 2020 पासून स्पेसएक्स हे काम करतंय.