मुंबई : जगप्रसिद्ध सुएझ कालव्यात एक महाकाय जहाज अडकलं आहे, हे जहाज हटवण्यासाठी मागील ४८ तासापासून प्रयत्न सुरु आहेत. पण कालव्यात अचानक आडव्या झालेल्या या जहाजामुळे जगातील व्यवहार ठप्प होण्यावर आले आहेत. कारण या जहाजाच्या मागे अनेक जहाजांच्या रांगा लागल्या आहेत. जगभरातील मोठ्या प्रमाणातील देवाण-घेवाण ही सुएझ कालव्याच्या माध्यमातून होत असते. हा कालवा १८६९ साली तयार करण्यात आला आहे.
चीनहून नेदरलँडच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर सागरी वाहतूक होते . मंगळवारी सकाळी चीनहून नेदरलँडच्या दिशेने मालवाहतूक करणारे असेच एक महाकाय कंटनेर जहाज सुएझच्या कालव्यातून जाताना नियंत्रण गमावल्याने कालव्यात अडकले .
सुएझ कालवा हा इजिप्तमधील एक कृत्रिम कालवा आहे. भूमध्य समुद्र आणि लाल समुद्रांना जोडणारा हा कालवा १९३.३ किलोमीटर (१२०.१ मैल) लांबीचा आहे. सुएझ कालव्याचे बांधकाम इ.स. १८६९ साली पूर्ण करण्यात आले. सुएझ कालव्याचे उत्तरेकडील टोक बुर सैद शहराजवळ तर दक्षिण टोक सुएझच्या आखातावरील सुएझ शहराजवळ स्थित आहे.
सुएझ कालव्यामुळे युरोप व आशिया या दोन खंडांदरम्यान जलद सागरी वाहतूक शक्य झाली आहे. सुएझ कालवा सुरु होण्यापूर्वी युरोपातून आशियाकडे जाणाऱ्या बोटींना आफ्रिका खंडाला सुमारे ७००० किमी लांबीचा वळसा घालून जावे लागत असे.
६ ऑगस्ट, २०१५ रोजी या कालव्याला समांतर असा ३४ किमी (२१ मैल) लांबीचा अजून एक कालवा सुरू करण्यात आला. यामुळे येथून दिवसाला ४९च्या ऐवजी ९७ जहाजे जाऊ शकतील.
सुएझ कालवा प्राधिकरण या संस्थेकडे कालव्याची मालकी आणि देखभालीची जबाबदारी आहे. ही संस्था इजिप्त सरकारने १९५६ मध्ये स्थापन केली
A ship, stretching more than 1,300 feet, ran aground at the Suez Canal and blocked one of the world’s most vital shipping lanes, leaving more than 100 ships stuck at each end of the canal. https://t.co/HlHo9Od9J5 pic.twitter.com/eojCcoBhfs
— The New York Times (@nytimes) March 24, 2021
अडकलेल्या या जहाजावर पनामा देशाचा झेंडा लावला आहे. या जहाजाची लांबी ४०० मीटर तर ५९ मीटर रुंदी आहे. मालवाहतूक करणाऱ्या जहाजाला बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर टग बोट्स तैनात करण्यात आल्या आहेत. पण, तरीही हे जहाज बाहेर काढण्यासाठी आणखी किती कालवधी लागू शकतो, हा प्रश्न अजुनही अनुउत्तरीत आहे.
मालवाहतूक करणाऱ्या या एका जहाजमुळे अनेक जहाजांची वाहतूक खोळंबली आहे. लाल सागर आणि भूमध्य सागराच्या किनारी जहाजांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. सुएझ कालव्याच्या माध्यमातून दररोज हजारो जहाज आशिया-युरोप खंडांदरम्यान मोठी जलद सागरी वाहतूक प्रवास करत असतात.
सुएझ कालव्यातील हा मार्ग आणखी काही काळ बंद राहिल्यास जहाजांना आफ्रिका खंडाला ७ हजार किमी लांबीचा वळसा घालून युरोपमध्ये जावे लागणार आहे. सुएझ कालवा १९३.३ किमी लांबीचा असून हा कालवा भूमध्य समु्द्र आणि लाल समुद्राला जोडतो.
रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबपर्यत रांगा लागलेल्या तुम्ही पाहिल्या असतील. पण समुद्रात झालेला हा ट्रॅफीक जॅम जरा अजबच! काही तासापासून नाही, तर गेल्या दोन दिवसांपासून समुद्रातील वाहतूक खोळंबली आहे.रस्ते, हवाईमार्गाप्रमाणेच सागरा मार्गातूनही मोठी वाहतूक होते.
खरं तर फक्त एका गावातून दुसऱ्या गावात, किंवा एका देशांतून दुसऱ्या देशांत, जाण्यासाठी नाही तर एका खंडातून दुसऱ्या खंडात जाण्याऱ्या मोठ्या प्रवासासाठी सागरी मार्गाचा वापर करण्यात येतो. अशाच सागरी प्रवासात मालवाहतूक करणारे एक महाकाय कंटनेर जहाज अडकले आहे.