जपानला चक्रीवादळाचा तडाखा, १० जणांचा मृत्यू

जपानच्या पश्चिम भागाला चक्रीवादळाचा जबर तडाखा बसला आहे. जनजीवन पुरतं प्रभावित झाले आहे

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 5, 2018, 10:27 PM IST
जपानला चक्रीवादळाचा तडाखा, १० जणांचा मृत्यू title=

टोकीओ : जपानच्या पश्चिम भागाला चक्रीवादळाचा जबर तडाखा बसला आहे. जनजीवन पुरतं प्रभावित झाले आहे. हजारो नागरिक ठिकठिकाणी अडकले आहेत. दरम्यान, युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे. विमानतळावर ३००० प्रवासी अडकलेत. तर या वादळात ३०० हून अधिक लोक जखमी झालेय. वादळ आणि मोठ्या लाठांमुळे अनेकांना तडाखा बसलाय.

जपानच्या पश्चिम भागाला चक्रीवादळाचा जबर तडाखा बसल्यामुळे जनजीवन पुरतं प्रभावित झालं असून, ठिकठिकाणी असंख्य नागरिक अडकून पडले आहेत. अशा परिस्थितीत कनसाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडकलेले हजारो प्रवासी, बस आणि बोटनं प्रवास करत आहेत. दरम्यान, ६०० विमान फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या नैसर्गिक आपत्तीचा सामना करत, यंत्रणा युद्धपातळीवर मदतकार्य करत आहेत. यामध्ये दहा जण मृत्यू पावल्याची माहिती मिळेतय. तर ३०० हून अधिक जण जखमी झाल्याचं समजतंय.