करोडपती कुत्रा, ४३० कोटींची संपत्तीचा मालक, आता विकतोय २३० कोटींचा बंगला

तुम्ही करोडपती कुत्रा पाहिलाय का ? सिनेमातला नव्हे, प्रत्यक्षात या कुत्र्याची संपत्ती आहे तब्बल 430 कोटी. यातली एक मोठी हवेली तो आता विकणार आहे.   

Updated: Nov 23, 2021, 09:44 PM IST
 करोडपती कुत्रा, ४३० कोटींची संपत्तीचा मालक, आता विकतोय २३० कोटींचा बंगला  title=

मुंबई : तुम्ही करोडपती कुत्रा पाहिलाय का ? सिनेमातला नव्हे, प्रत्यक्षात या कुत्र्याची संपत्ती आहे तब्बल 430 कोटी. यातली एक मोठी हवेली तो आता विकणार आहे. बघुयात हा स्पेशल रिपोर्ट. अक्षय कुमारचा एन्टरटेनमेंट सिनेमा आठवतोय? एक प्रसिद्ध हिरे व्यापारी आपल्या एन्टरटेनमेंट नावाच्या कुत्र्याला आपला वारसदार बनवतो आणि हा कुत्रा करोडपती होतो. मात्र हे प्रत्यक्षात घडलंय. (special report on richest dog Gunther who selling 230 crore rupees bunglow)

हा आहे जगातला खराखुरा करोडपती कुत्रा. याचं नाव आहे 'गंथर फोर्थ'. त्याची संपत्ती किती आहे हे ऐकलंत तर तुमचे डोळे पांढरे होतील. हा गंथर तब्बल 430 कोटींचा मालक आहे. तो चर्चेत आलाय 230 कोटींची एक प्रॉपर्टी विक्रीला काढल्यामुळे.

 

अमेरिकेतल्या मियामीमध्ये असलेली ही शानदार हवेली गंथरची आहे. त्याचा बाप गंथर थर्ड याच्या नावे त्याची मालकीण काऊंटेस कार्लोटा यांनी 1992 साली ही प्रॉपर्टी केली होती. गंथर थर्डच्या मृत्यूनंतर गंथर फोर्थ मालक झालाय. दिवाणखान्यात फायरस्पेसच्या वरती गंथर फोर्थचं सोन्याचा मुलामा दिलेलं चित्रही टांगलं आहे.

बिस्केन चौपाटीचा व्ह्यू असलेल्या या हवेलीमध्ये 9 बेडरूम्स आणि 8 बाथरूम आहेत. आवारात एक शानदार स्वीमिंग पूलही आहे. आजुबाजुला घनदाट झाडी आहे. हवेलीच्या दुसऱ्या बाजूनं संपूर्ण मियामी शहराचा नजारा दिसू शकतो. एकेकाळी प्रसिद्ध हॉलिवूड सिंगर मॅडोनादेखील या हवेलीची मालकीण होती.

गंथर या संपत्तीचा मालक कसा झाला, याबाबत वाद आहेत. 1995 साली इटलीतील एका वर्तमानपत्रानं कार्लोटा नावाची कुणी महिला नव्हतीच असा दावा केलाय. मात्र हवेलीच्या जुन्या मालकांनी कार्लोटानंच गंथरला संपत्ती दिल्याचं म्हटलंय. ते काही असो. हा कुत्रा 430 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे, हे मात्र खरं. म्हणतात ना. हर कुत्ते का दिन होता है.