SpaceX Polaris Dawn : प्रशिक्षीत अंतराळवीरच अंतराळात जाऊन स्पेसवॉक सारखे वैज्ञानिक प्रयोग करतात. मानवी इतिहासात पहिल्यांदाच एक सर्वसामान्य नागरिक अंतराळात गेला आहे. इतकचं नाही तर एका सामान्य नागरिकाने पृथ्वीपासून 737 किमी वर अंतराळात स्पेसवॉक केला आहे. मानवी इतिहासात पहिल्यांदाच असं घडल आहे. यामुळे येत्या काळात अंतराळाची सफर करण्याचे स्वप्न सहज पूर्ण होऊ शकते. SpaceX च्या Polaris Dawn मिळन मोहिमेअंतर्गत एका सर्वसामान्य नागरिकाने हा स्पेसवॉक केला आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
SpaceX च्या पोलारिस डॉन मिशनने एक नवीन विक्रम रचला आहे. पहिल्यांदाच सर्वसामान्य नागरिकाने पृथ्वीपासून 737 किलोमीटर उंचीवर अंतराळात स्पेसवॉक केला आहे. अपोलो मोहिमेच्या तब्बल 50 वर्षानंतर मानवी अंतराळ मोहिम यशस्वी झाली आहे. मिशन कमांडर जेरेड इसाकमन यांनी नवीन प्रगत प्रेशराइज्ड सूटमध्ये पहिला स्पेसवॉक केला आहे. या व्हिडिओ त्यांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे.
Commander @rookisaacman has egressed Dragon and is going through the first of three suit mobility tests that will test overall hand body control, vertical movement with Skywalker, and foot restraint pic.twitter.com/XATJQhLuIZ
— SpaceX (@SpaceX) September 12, 2024
सर्वसामान्य माणसांना अंतराळाची सफर घडवण्यासाठी एलॉन मस्क यांनी SpaceX Polaris Dawn मिशन लाँच केले आहे. या मोहिमेअंतर्गत चौघांना अंतराळात पाठवण्यात आले. अंतराळातील पहिल्या टूरवर जाणाऱ्या चौघांनी एलॉन मस्क यांच्या SpaceX Polaris Dawn मिशन गुंतवणुक केली आहे. जेरेड इसाकमन, माजी हवाई दल लेफ्टनंट कर्नल स्कॉट "किड" पोटेट आणि SpaceX अभियंते सारा गिलिस आणि एना मेनन यांचा समावेश आहे.
12 जुलै रोजी SpaceX Polaris पहिल्या स्पेसटूरसाठी उड्डाण घेणार होते. मात्र, तयारी पूर्ण झालेली नव्हती. यामुळे हे मिशन पुढे ढकलण्यात आले. अखेरीस 26 ऑगस्ट रोजी पोलारिस डॉन मिशन लाँच करण्यात येणार होते. प्री-फ्लाइट चेकअपमध्ये त्रुटी आढळल्यानंतर ते पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर हेलियम गळतीमुळे 27 ऑगस्टला होणारे लाँचिंग पुन्हा एकदा रद्द करण्यात आले. यानंतर 28 तारखेला मिशन लाँच करण्याचा प्लॅन बनवला गेला. पण खराब हवामानामुळे पुन्हा एकदा उड्डाण रद्द करण्यात आले. अखेरीस 10 सप्टेंबर 2024 रोजी SpaceX Polaris Dawn स्पेसक्राफ्ट लाँच करण्यात आले. केप कॅनवेरल येथून फाल्कन-9 रॉकेटच्या मदतीने या स्पेसक्राफ्टचे प्रक्षेपण करण्यात आले.
पृथ्वीपासून 737 किमी वर अंतराळात मिशन कमांडर जेरेड इसाकमन यांनी स्पेसवॉक केला आहे. प्रेशराइज्ड स्पेस सूटचे टेस्टिंग करण्यासाठी हा स्पेसवॉक घेण्यात आला. व्हिडिओमध्ये जेरेड हे हात आणि पायाच्या हालचाली करताना दिसत आहे. स्पेस टूरच्या अनुषंगाने ही मोहिमचे यश हे मैलाचा दगड ठरणार आहे.