Mother Son Viral Video : आई मुलांचं नातं जगातील सर्वात सुंदर पवित्र नातं आहे. गर्भधारणेपासून तिचं आपल्या मुलांशी नाळ जुळते. ती आईच्या मरणानेच तुटते. मुलाच्या रक्षणासाठी तिचं रौद्ररुपही आपण पाहिलं आहे. मुलाला काहीही झालं तरी तिचा जीव कासावीस होतो. विचारही करवत नाही आपल्या लेकाराला काही झालं तर...एका आईवर दु:खाचं डोंगर कोसळलं जेव्हा तिचा मुलगा कोमात गेला. हताश आईची ही कहाणी सोशल मीडियावर प्रत्येकाच्या डोळे पाणावतेय.
लेकरु आजारी पडला तर आईच्या जीवात जीव राहत नाही. त्यात जर तो कोमात असेल तर...मरण यातनाच...डिस्ट्रोफिक एपिडर्मोलिसिस बुलोसा नावाच्या दुर्मिळ आजाराने जन्माताच त्याला गाठलं होतं. या आजारामध्ये तिला आतील त्वचा आणि बाहेरील त्वचा यांना एकत्र बांधणारे कोलेजन तयार होत नाही. त्यामुळे या चिमुकल्याच्या अंगावर जखम, फोड आणि पुरळ आलेले आहेत. (son came out from coma after 16 days mother reached hospital Instagram emotional video gone viral on Internet Google trend now)
एक वेळ अशी आली की त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करावं लागलं. उपचारादरम्यान तो चिमुकला कोमात गेला. त्याला कधी जाग येईल या प्रतीक्षेत आता ती माऊली होती. दिवसरात्र त्याची सेवा करत आणि आई म्हणून तो कधी हाक मारले याची वाट पाहत असताना. कामानिमित्त तिला घरी जावं लागलं.
नेमकं त्याचवेळी रुग्णालयातून माऊलीला बाळाविषयी सांगणारा फोन आला. या फोननंतर तिचं आयुष्यच बदलं. आई धावत हॉस्पिटलकडे धाव घेतली आणि रुमचा दरवाजा उडताच तिच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.
तिचं स्वप्न पूर्ण झालं होतं, लेकराने 16 दिवसानंतर डोळे उघडून आई म्हणून तिला हाक मारली होती. आईने बेडवरील मुलाला मिठी मारली आणि दोघांच्या डोळ्यात अश्रूचा ओघ सुरु झाला.
या मायलेकाच्या भावनिक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर व्हायरल होतो आहे. sachkadwahai's या अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटिझन्सच्या डोळ्यात पाणी येतंय.
'त्याला खूप गंभीर न्यूमोनिया झाला होता, त्यामुळे तो कोमात गेला होता. आई रोज त्याच्यासोबत राहायची आणि तो ज्या दिवशी उठला त्याच दिवशी ती घरी गेली होती,' असं एका यूजरने म्हटलं आहे.