Video : ....अन् नदीचं पाणी रहस्यमयीरित्या रक्तासारखं लाल झालं; पाहून उडतोय थरकाप

Viral Video : सोशल मीडियावर प्रत्येक वेळी वायफळ गोष्टीच व्हायरल होतात असं नाही. तर, सोशल मीडियावर अनेकदा काही अशाही गोष्टी नजरेस पडतात ज्या आपल्याला हैराण करतात.  

सायली पाटील | Updated: Dec 27, 2023, 03:01 PM IST
Video : ....अन् नदीचं पाणी रहस्यमयीरित्या रक्तासारखं लाल झालं; पाहून उडतोय थरकाप title=
shocking video Russias Iskitimka river turns beetroot red know the reason

Viral Video : जगाच्या पाठीवर असणारी अनेक ठिकाणं पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. काही ठिकाणी तिथं असणाऱ्या रहस्यमयी वातावरणामुळं चर्चेत येतात तर काही ठिकाणचं वास्तव अंगावर येणारं असतं. सध्या अशाच एका ठिकाणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर एकाएकी प्रकाशात आला आहे. कारण ठरतंय ते म्हणजे तिथं घडलेली एक विचित्र घटना. 

व्हायरल होणारा व्हिडीओ कोणत्या ठिकाणचा? 

अनेक अकाऊंटवरून व्हायरल होणारा हा व्हिडीओ आणि नेटकरी शेअर करत असणारे काही विचलित करणारे फोटो आहेत रशियातील एका नदीचे. दक्षिण रशियातील Kemerovo इथं असणाऱ्या Iskitimka नदीपात्रात अचानकच धडकी भरवणारा बदल झाल्यामुळं संपूर्ण जग चिंतेत पडलं आहे. 

अतिशय रहस्यमयीरित्या या नदीचं पाणी रक्तासारखं लालबुंद झालं आहे. ज्यामुळं अनेकांच्याच पायाखालची जमीनही सरकलीये. रशियाच्या या भागात राहणाऱ्या स्थानिकांनी सर्वप्रथम हा बदल पाहिला जिथं काचेइतकं पारदर्शक पाणी असणारं नदीपात्र रक्ताचे पाट वाहावेत असं दिसू लागलं ज्यामुळं एरव्ही या पात्राच्या काठावर असणारे बदक आणि तत्सम जीव पाण्यात पायही ठेवण्यात तयार नव्हते. 

हेसुद्धा वाचा : रुपवान अभिनेत्रीही मुकेश अंबानींच्या भाचीपुढं फिक्या; जगप्रसिद्ध विद्यापीठातून शिकलेली 'ती' कोणाची सून? 

सांडपाण्याचा निचरा होण्याच अडथळे आणि प्रदूषणामुळं काही घातक घटकांनी या पात्रातील पाणी लालबुंद झाल्याचं स्थानिक जाणकारांनी म्हटलं. पण, पाण्याचा रंग बदलण्यामध्ये ठराविक रसायन कारणीभूत आहे का यावरील तपास मात्र अद्याप सुरुच आहे. दरम्यान या साऱ्यामध्ये जागतिक स्तरावर पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवण्याची गरज सातत्यानं भासत असून आता त्या दृष्टीनं पावलं उचलली जाणंही गरजेचं असल्याचा सूर अनेकांनी आळवला आहे. 

काही वर्षांपूर्वीही घडलेली अशीच घटना... 

जून 2020 मध्येही अशीच एक घटना घडली होती. ज्यावेळी आर्क्टिक भागातील नद्यांचं पाणीही लाल रंगाचं झालं होतं. सायबेरियाच्या उत्तरेकडे असणाऱ्या Norilsk जवळ diesel reservoir कोसळल्यामुळं हे संकट ओढावलं होतं. मानवी संस्कृती जितकी वेगानं प्रगती करत आहे तितक्याच वेगानं पर्यावरणाचाही ऱ्हास होत असून, याचेही थेट परिणाम जीवसृष्टीवर होताना दिसत आहेत. त्यामुळं कुठंतरी या गोष्टी थांबणंही तितकंच गरजेचं आहे.