मुंबई : कोणत्याही गोष्टीमध्ये तांत्रिक बिघाड होणं सहाजीकच आहे. असे बिघाड विमान, ट्रेन किंवा कोणत्याही वाहानात होऊ शकतो. तुम्ही बऱ्याचदा ऐकलंच असेल की, काही बिघाडामुळे ट्रेन, बस किंवा विमान उशीरा येतं किंवा कॅन्सल म्हणजेच रद्द होतं. ते एक तंत्र आहे आणि त्यामुळे त्यात हा बिघाड तर होणारच. पण जेव्हा या बिघाडामुळे कोणाचे प्राण पणाला लागतात. तेव्हा हे फारच भीषण बनते.
सध्या सोशल मीडियावरती असाच एका तंत्रिक बिघाडीमुळे झालेल्या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो धक्कादायक आहे.
आपण हे ऐकले असेल की कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी विमानाची आपत्कालीन लँडिंग केली जाते. परंतू या आपत्कालीन लँडिंगचा परिणाम असा होऊ शकतो, याचा कोणी विचारही केला नसावा.
ही घटना रविवारी लॉस एंजेलिसमध्ये घडली आहे. या पायलटच नशीब बलवत्तर म्हणून एकाच दिवशी काही सेकंदाच्या फरकाने दोनदा त्याचा मृत्यू टळला. त्याचे विमान आधी लॉस एंजेलिसच्या रेल्वे रुळांवर कोसळले.
तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की एक अधिकारी पायलटला या विमानाच्या कॉकपिटमधून वाचवताना दिसत आहे, त्याच वेळी पुढच्या सेंकंदालाच एक प्रवासी ट्रेन येऊन विमानाला धडक देते, ज्यामुळे त्या विमानाचे तुकडे तुकडे होतात.
ट्रेन धडकायच्या काही सेकंद आधीच एका पोलिसाने या पायलटचे प्राण वाचवले. क्रिस्टोफर झाइन असं त्या पायलटच नाव आहे, पॅकोमाच्या सॅन फर्नांडो व्हॅली इथल्या व्हाइटमन विमानतळावरून टेकऑफ करताना विमानाचं इंजिन निकामी झाले आणि काही क्षणांनंतर ते खाली कोसळलं.
OMG—Train collides with a crashed plane just 2 seconds after @LAPDFoothill police pull the pilot from the wreckage earlier today. The bystander who recorded this was nearly hit by large flying debris. LAPD officer’s body cam further below—amazing heroism https://t.co/HFbd47q9a0 pic.twitter.com/pJssGZsrPM
— Eric Feigl-Ding (@DrEricDing) January 10, 2022
विमान विमानतळाला लागून असलेल्या फूटहिल डिव्हिजन स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर विमान क्रॅश झाले. पोलिस अपघाताच्या ठिकाणी लगेच पोहोचले. मेट्रोलिंकला सर्व ट्रेन थांबवण्याची विनंती केली होती, परंतु तसे झाले नाही, परंतू पोलिसांच्या प्रसंग आवधानाने पायलटचे प्राण वाचले. विमानात पायलट हा एकमेव व्यक्ती होता. पायलटच्या चेहऱ्याला लागले आहे, शरिरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.