Viral Video: बीळ नाही;महिलेच्या कानात घुसला साप...निघता निघेना...वेदनेने विव्हळत महिलेची डॉक्टरकडे धाव

viral video: माणसाच्या कानात साप सापडणं  ही काही सामान्य गोष्ट नाही. या व्हायरल क्लिपमध्ये (viral video) एक 'डॉक्टर' महिलेच्या कानातून साप काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे

Updated: Jan 16, 2023, 11:58 AM IST
Viral Video: बीळ नाही;महिलेच्या कानात घुसला साप...निघता निघेना...वेदनेने विव्हळत महिलेची डॉक्टरकडे धाव title=

Trending snake video: माणूस जगात सर्वात जास्त कोणत्या प्राण्याला घाबरत असेल तर साप हे नाव तोंडावर आल्याशिवाय राहणारच नाही. साप नाव जरी काढलं तरी आपल्या अंगाचा थरकाप उडतो . हाथ पाय नसलेला सरपटत चालणार हा जीव, मात्र एका दंशात इतकी ताकद की, जागीच माणसाचा मृत्यू अटळ असतो . त्यामुळे सापाला सर्वच जण घाबरतात.  (Scarry snake video viral)

गावच्या ठिकाणी बऱ्याचदा आपल्या घरात साप घुसल्याच्या घटना घडतात, कधी बेडमध्ये कधी बिछान्यात साअप घुसल्याच्या अनेक घटना आपण पहिल्या असतील . पण आज जो व्हिडीओ समोर आला आहे तो पाहून तुमचा स्वतःवर आणि स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही हे नक्की .

सध्या हा व्हिडीओ अनेक लोकांचं लक्ष वेधून घेतोय. तसा पाहिला तर हा जुना व्हिडीओ आहे मात्र पुन्हा एकदा तो सोशल मीडियावर (social media) धुमाकूळ घालत आहे. आणि सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आपण दररोज पाहतच असतो,  काही असे व्हिडीओ असतात जे सारखे सारखे पाहिले जातात आणि शेअरसुद्धा केले जातात. 

सध्या इंटरनेटवर ही व्हिडीओ क्लिप अगदी वाऱ्यासारखी पसरलीय  आणि पाहणाऱ्यांना धक्काच बसलाय . (viral video)

माणसाच्या कानात साप सापडणं  ही काही सामान्य गोष्ट नाही. या व्हायरल क्लिपमध्ये (viral video) एक 'डॉक्टर' महिलेच्या कानातून साप काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सुरवातीला हा व्हिडीओ पाहून तुम्हाला अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

या  व्हिडीओमध्ये एका महिलेच्या कानातून चक्क साप काढण्याचा प्रयत्न केला जात आहे (snake in womans ear viral video),साप  महिलेच्या कानात शिरलाय आणि डॉक्टरांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्याचं काम सुरु असल्याचं दिसत आहे . 

एकूणच हा व्हिडीओ पाहताना अंगावर शिसारी येते कारण बराच प्रयत्न करुनसुद्धा हा साप (snake) बाहेर निघत नाहीये इतकंच काय तर तोंडाजवळ हाथ लागताच हा साप चावण्यासाठी हिंसक झाला , हे पाहून  धक्काच बसला.  

चंदन कुमार सिंग नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि पाहता पाहता हा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरला. 3.49 मिनिटांचा हा व्हिडीओ पाहताना त्या महिलेची अवस्था बघवत नाहीये तिला जो त्रास होत आहे तो या व्हिडिओमधून स्पष्ट दिसत आहे.