शेख हसीना पाचव्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान, भारताशी कसा आला संबंध? जाणून घ्या

Bangladesh PM Sheikh Hasina: याआधी हसीना शेख यांनी 1996 ते 2001 पर्यंत पंतप्रधानपद भूषवले होते.

Updated: Jan 8, 2024, 12:33 PM IST
शेख हसीना पाचव्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान, भारताशी कसा आला संबंध? जाणून घ्या title=

Sheikh Hasina News in Marathi: अवामी लीगच्या सर्वोच्च नेत्या शेख हसीना या पाचव्यांदा बांग्लादेशच्या पंतप्रधान झाल्या आहेत. 2009 पासून त्या सातत्याने बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत.  बांगलादेशमध्ये शेख हसीना यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पक्ष अवामी लीगने 300 जागांपैकी दोन तृतीयांशपेक्षा जास्त जागा जिंकल्या आणि पाचव्यांदा पंतप्रधान होण्याचा मान मिळवला. याआधी 1991 ते 1996 या काळात शेख हसीनाही पंतप्रधान होत्या.

कोण आहेत शेख हसीना?

याआधी त्यांनी 1996 ते 2001 पर्यंत पंतप्रधानपद भूषवले होते. रविवारी झालेल्या मतदानात विजयानंतर शेख हसीना पाचव्यांदा बांगलादेशच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहेत. शेख हसीना या बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीबुर रहमान यांच्या कन्या आहेत. शेख हसीना यांना राजकारणात रस नसला तरी परिस्थितीमुळे त्यांना सत्तेवर यावे लागले होते. 

वडिलांचा खून 

1971 साली बांगलादेश हा वेगळा देश झाला. याआधी हा भाग पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखला जात होता आणि त्यावर पाकिस्तान सरकारचे राज्य होते. या नव्या देशाचे पहिले नेते शेख मुजीबुर रहमान होते. पण मुजीब रहमान सत्तेवर येऊन काही वर्षेच झाली होती आणि देशात अस्थिरता पसरली. कम्युनिस्ट चळवळीच्या काळात शेख यांचे सरकार पाडण्यात आले. 1975 मध्ये शेख मुजीबुर रहमान यांचे संपूर्ण कुटुंब लष्कराने मारले होते पण शेख हसीना आणि त्यांची बहीण रेहाना त्यावेळी जर्मनीत होत्या. यामुळे त्यांचा जीव वाचला. त्यानंतर बांगलादेश पुढील 15 वर्षे लष्कराच्या ताब्यात राहिला.

इंदिरा गांधींनी दिला राजकीय आश्रय

शेख हसीना यांनी जर्मनीतील बांगलादेशचे राजदूत हुमायून रशीद चौधरी यांच्याशी संपर्क साधला. हुमायूनचा भारतातील अनेक राजकारण्यांमध्ये चांगला प्रभाव होता. म्हणून एकदा त्यांनी भारताचे राजदूत वाय के पुरी यांना शेख हसीना आणि त्यांच्या बहिणीला राजकीय आश्रय देण्यास सांगितले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना याचा वारा लागला आणि त्यांनी तात्काळ शेख हसीना आणि त्यांच्या बहिणीला एअर इंडियाच्या विमानाने भारतात बोलावले. तसेच शेख हसीना यांचे पती डॉ वाजेद यांना अणुऊर्जा विभागात फेलोशिप देण्यात आली. भारत सरकारने शेख हसीना यांना पंडारा रोडजवळ फ्लॅट दिला होता. जवळपास सहा वर्षे त्या येथे वास्तव्यास होत्या. 

घरवापसी

सहा वर्षे भारतात राहिल्यानंतर त्या बांगलादेशात गेल्या आणि बीटीपी नेत्या खालिदा झिया यांच्यासोबत राजकारण सुरू केले. 1991 मध्ये खालिदा झिया पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. त्यानंतर केवळ पाच वर्षांनी शेख हसीना यांच्या अवामी पक्षाने निवडणुका जिंकल्या. 1996 मध्ये शेख हसीना पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या.