कुटूंबासोबत मासेमारी करायला गेलेल्या तरुणासोबत घडला विचित्र प्रकार... ज्यामुळे गमवावं लागलं आपलं बोट

खरंतर समुद्रातील शार्कच्या तोंडातून हुक काढण्याचा प्रयत्न करताना त्याने माणसाचे बोट चावले, ज्यामुळे या व्यक्तीला एक भयानक अनुभव आला.

Updated: Jul 25, 2022, 10:49 PM IST
कुटूंबासोबत मासेमारी करायला गेलेल्या तरुणासोबत घडला विचित्र प्रकार... ज्यामुळे गमवावं लागलं आपलं बोट title=

मुंबई : हुशार असणं ही एक चांगली गोष्ट आहे. परंतु अती हुशार असणं हे त्या व्यक्तीसाठी जास्त हानिकारक ठरु शकतं आणि याचं एक उदाहरण देखील सोशल मीडियावर सर्वांसमोर आलं आहे. ज्याची इंटरनेटवर जोरदार चर्चा होत आहे. एका व्यक्तीने समुद्रात जाऊन आपली नको तिथे हुशारी दाखवली, ज्यामुळे तो त्यामध्ये वाईटरित्या अडकला आहे, ज्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.

खरंतर समुद्रातील शार्कच्या तोंडातून हुक काढण्याचा प्रयत्न करताना त्याने माणसाचे बोट चावले, ज्यामुळे या व्यक्तीला एक भयानक अनुभव आला.

ब्रेट रीडर या मच्छिमाराने 19 जुलै रोजी आपल्या कुटुंबाला फ्लोरिडाच्या किनार्‍यावर मासेमारीच्या सहलीवर नेले. तेव्हा मासेमारी करत असताना त्याच्यासोबत ही घटना घडली.

ब्रेट आपल्या मुलाला प्रभावित करण्यासाठी शार्कला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याने शार्कला वरुन पकडले आणि आपला दुसरा हात शार्कला उचलण्यासाठी त्याच्या तोंडाच्या खाली घातला. पण शार्कने अचानक ब्रेटचा हात पकडला होता.

ब्रेटच्या मुलाने हे दृश्य पाहिले तेव्हा त्याला इतकंच दिसलं की, तथे काहीतरी झालं ज्यामुळे संपूर्ण पाण्यात फक्त आणि फक्त रक्तच दिसत आहे. ज्यानंतर ब्रेटचा मुलगा तेथून ओरडत लांब पळाला.

ज्या व्यक्तीसोबत ही घटना घडली त्या व्यक्तीने सांगितले की, ''मी माझे हुक परत मिळविण्यासाठी आणि शार्कला सोडून देण्यासाठी प्रयत्न करत होतो, म्हणून मी त्याला उचललं, परंतु दुर्दैवाने शार्कने माझे बोट पकडले. यानंतर, काही सेकंदात, माझ्यासोबत एक धोकादायक अपघात घडला. शार्क इकडे तिकडे फिरू लागला आणि माझा हात रक्ताने माखला.''

शार्कच्या हल्ल्यात बळी पडलेल्या ब्रेटच्या पत्नीने त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेले आणि या घटनेनंतर त्यांनी मुलाला शांत केले आणि तेथून त्याला समुद्रातून किनाऱ्यावर नेण्यात आले.

ही बातमी समोर येताच लोक वेगवेगळ्या कमेंट करु लागले आहे. काही लोक म्हणत आहेत की, या व्यक्तीचे नशीब निश्चितच चांगले नव्हते. तर काही लोकांचे म्हणणे आहे की त्याने असा अति शहाणपणा करायला नको हवा होता.