Inside Story | 'ही' 7 कारणं आणि इमरान खान यांच्यावर AK47 ने झालेला जीवघेणा हल्ला...

इमरान खान यांच्यावर का झाला हल्ला? नेमकी त्यामागील कारणं काय? जाणून घेऊयात Inside Story मधून 

Updated: Nov 4, 2022, 04:43 PM IST
Inside Story | 'ही' 7 कारणं आणि इमरान खान यांच्यावर AK47 ने झालेला जीवघेणा हल्ला... title=

अनिकेत पेंडसे, झी मीडिया : Imran Khan Firing : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा भर रॅलीत हत्येचा प्रयत्न ( Imran khan latest news) करण्यात आला. भर गर्दीत, भर वस्तीत इम्रान यांना AK-47 नंच उडवण्याचा प्लान होता. हा प्लान फसला, इमरान यांचा जीव वाचला. हल्लेखोरही ताब्यात आहे. पण इम्रान यांच्या जीवावर कोण उठलंय, का उठलंय, इमरान यांच्यावर खुनी हल्ला का झाला ( Attack on Imran Khan) , याचं कवित्व आता रंगायला लागलंय. काही महिन्यांमधल्या इमरान यांच्या हालचालींवर आणि विधानांवर नजर टाकली तर कल्पना येऊ शकते की इमरान यांच्यावर इतका ( Why Imaran Khan Was Shot) खुनी हल्ला का झाला ते.

इमरान यांच्यावर हल्ला का झाला? 

  • कारण नंबर 1 - भ्रष्टाचाराचे आरोप झाले, पंतप्रधानपद सोडावं लागलं
  • कारण नंबर 2 -भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळत इमरान लोकांमध्ये फिरतायत
  • कारण नंबर 3 - तोशखाना प्रकरणात दोषी आढळल्यानंतर आझादी रॅली
  • कारण नंबर 4 - त्यांच्या तेहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या रॅलींना तुफान गर्दी
  • कारण नंबर 5 - पाकिस्तानातल्या आर्थिक स्थितीवर इम्रान यांनी राळ उठवलीय
  • कारण नंबर 6 - अमेरिकेनं सत्ता उलथवण्याचा कट केल्याचा इमरान यांचा आरोप
  • कारण नंबर 7 - इम्रान यांच्यामुळे अमेरिकेविरोधात वातावरण तापल्याची भिती

दरम्यान, याच कारणांमुळे इमरान यांच्यावर हल्ला झाला अशी चर्चा असताना हल्लेखोराकडून मात्र वेगळंच स्पष्टीकरण देण्यात आलंय. आपल्यामागे कोणतीही संघटित शक्ती नाही, असा दावा हल्लेखोरानं केलाय.

पाहा संपूर्ण रिपोर्ट : 

यापूर्वी तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांची 27 डिसेंबर 2007 ला रॅलीतच हत्या करण्यात आली होती. तर 2008 मध्ये तत्कालीन पंतप्रधान युसूफ रझा गिलानींवरही रॅलीत जीवघेणा हल्ला झाला होता. आता माजी पंतप्रधान इमरान यांच्यावर हल्ला झालाय. पाकिस्तानच्या राजकारणाला असे जीवघेणे हल्ले नवीन नाहीत. मात्र या हल्ल्यामुळे पाकिस्तानातील राजकीय वातावरण तापणार हे नक्की.