मुंबई : जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. डॉक्टर आणि शास्त्रज्ञांना याला नियंत्रण करण्यासाठी अजून कोणतही लस मिळालेली नाही. कोरोना विषाणूचा शरीरावर किती काळ प्रभाव राहतो याबद्दल अद्याप माहिती नाही. कोरोना विषाणूमुळे बरे झाल्यानंतर शरीरात प्रतिकारशक्ती किती काळ टिकते हे देखील समोर आलेले नाही. या व्यतिरिक्त, बरे झाल्यानंतर पुन्हा संक्रमण होण्याचा किती धोका आहे यावरही संशोधन सुरु आहे.
त्याचबरोबर लॉकडाऊन हवटण्याची प्रक्रियाही हळूहळू सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूची आणखी एक लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही आरोग्य तज्ञ म्हणतात की, लॉकडाऊन उघडणे खूप घाईचे होईल. त्याच वेळी, काही लोकांचे मत आहे की अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी लॉकडाऊन उघडणे आवश्यक आहे.
सामान्य भाषेत कोरोनाच्या दुसर्या लाटेचा अर्थ असा की, रुग्णांची संख्या कमी होत असताना अचानक पुन्हा संक्रमण वाढणे. अमेरिकेत कोरोना विषाणूचे प्रमाण वाढत असताना, बर्याच देशांमध्ये मात्र रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहेत. हे कोरोनाच्या पहिल्या लाटीचा अंत होत असल्याचं सूचित करतो. जेव्हा संसर्गाचे प्रमाण पुन्हा वाढते तेव्हा त्याला दुसरी लाट म्हणता येईल. डब्ल्यूएचओनेही कोरोनाच्या दुसर्या लाटेचा इशारा दिला आहे. हा रोग जितका जास्त काळ टिकेल तितक्या त्याच्या लाटा वाढत जातील.
कोरोना विषाणूचा परिणाम संपूर्ण जगावर झाला आहे. कोरोनाचा प्रसार अमेरिकेतील बर्याच राज्यात एकत्र झाला नाही. लॉकडाउन आणि सोशल डिस्टंसिंगही वेगवेगळ्या टप्प्यावर केले गेले. काही आरोग्य तज्ञांनी असा इशारा दिला आहे की, जर संपूर्ण नियोजन करून लॉकडाउन हटविले गेले नाही आणि लोक एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी प्रवास करत राहिले तर कोरोना विषाणूचा पुन्हा प्रसार होऊ शकतो आणि लवकरच त्याची दुसरी लाट येऊ शकते.
भारतात प्रवास करण्यासाठी आणि आपल्या राज्यात जाण्यासाठी परवानगी दिली गेल्यानंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. सीडीसीचे एक माजी अधिकारी अली खान यांचे म्हणणे आहे की, कोरोनाच्या दुसर्या वेव्हमध्ये एकाच वेळी बर्याच गोष्टी असू शकतात, त्याचा उद्रेक काही विचित्र मार्गाने होऊ शकतो.
लॉकडाऊनमध्ये दिलासा दिल्यानंतर आरोग्य अधिकारी संसर्गाच्या वाढत्या घटनांवर लक्ष ठेवून आहेत. कोरोना विषाणूची ही दुसरी लाट असू शकते. यूएस सीडीसीचे संचालक डॉ. रॉबर्ट रेडफिल्ड आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अॅन्ड इन्फेक्टीव्ह डिजीजचे संचालक डॉ. अँथनी फौसी यांच्यासह अनेक आरोग्य तज्ञांचा असा विश्वास आहे की कोरोना विषाणूची दुसरी लाट थंडीत येऊ शकते.
उन्हाळ्यात फ्लूचे प्रमाण कमी होते. यामुळेच काही आरोग्य तज्ञ म्हणतात की, उन्हाळ्याच्या काळात कोरोना विषाणूचे प्रमाण कमी होईल. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीचे एमिस्टेमोलॉजिस्ट डॉ. अमेश अदलजा यांनी अमेरिकन न्यूज पेपर लॉस एंजेलिस टाइम्सला सांगितले की, उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये वाढणारे तापमान आणि अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे कोरोना विषाणू तितका प्रभावी नाही.
कोरोनाची दुसरी लाट आल्यास, त्याचा प्रसार लोक किती सामाजिक अंतर पाळतात आणि मास्क वापरतात यावर अवलंबून असेल. या व्यतिरिक्त, ते कोरोनाच्या चाचणीवर देखील अवलंबून असेल.
हाँगकाँग आणि कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संयुक्त अभ्यासानुसार, 80 टक्के लोकं सार्वजनिक ठिकाणी जर मास्क वापरतील तर कोरोनाचा संसर्ग 8 टक्क्यांनी कमी होईल.