मास्को : Ukraine Russia Conflict : युक्रेनची जी शहरे घड्याळाच्या काटयांवर चालायची तिथे आता स्मशान शांतता आहे. नजर जाईल तिथे फक्त युद्धाच्या खाणाखुणा दिसतायत. आकांत करणारे, जखमी झालेले, अख्ख कुटुंब उद्धस्थ झालेले लोक दिसतायत. राजधानी कीवपासून 60 किमी असंतावरचं शहर बोरोड्यांकातलं हे अंगावर येणारं दृश्य. युद्ध कधी थांबेल, माहित नाही पण युद्धानं सगळं उद्धवस्थ झालंय हेच सध्याचं सत्य आहे. (Russia Ukraine War)
युक्रेनमध्ये रशियन सैन्याने नागरिकांवरही हल्ले सुरु केलेत. मारियुपोल शहरात रशियन सैन्यानं एका जोडप्यावर गोळीबार केला. शहर सोडताना या जोडप्याला एका चेकपॉइंटवर नागरिकांचे मृतदेह आढळले. दोघांनीही मदत करण्याचा प्रयत्न करताच रशियाच्या अजाव बटालीयनमधील सैनिकांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर तिचा पती गंभीर जखमी झाला आहे.
क्रेनमधील शहरांना लक्ष्य केल्यानंतर आता रशिया युक्रेनच्या बंदरांनाही लक्ष्य करत आहे. रशियन सैन्याच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर सागरी भागात कशी परिस्थिती आहे ते छायाचित्रातून समोर आला आहे. हा हल्ला ओडेसाजवळील बेलेन्कोव्ह या गावात घडली. हा हल्ला गावातील लष्करी डेपोत करण्यात आला.
रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे. कीव्हला रशियन फौजांनी चारही बाजूंनी वेढा दिला आहे. दरम्यान सोशल मीडियावर हल्ल्याचा एक लाईव्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. युक्रेनच्या चेर्निहाइव्ह शहरात एका कारच्या डॅशबोर्डवर लावलेल्या कॅमेऱ्यात क्षेपणास्त्र हल्ल्याचा थरार कैद झाला आहे. कार चालत असताना समोरच असलेल्या एका इमारतीवर क्षेपणास्त्र कोसळलं. कानठळ्या बसवणारा आवाज झाला.
युक्रेनच्या पोलटावामधल्या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आलाय. ज्यात युक्रेनी सुरक्षारक्षक रशियाची हत्यारं उद्ध्वस्त करताना दिसतोय. ही हत्यारं नष्ट करण्यासाठी या सैनिकाने रॉकेट प्रोपेल्ड गनचा वापर केला आहे. ज्यामुळे काही सेकंदात हत्यारं उद्ध्वस्त झाली.