मॉस्को : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या युद्धादरम्यान (Russia Ukraine War) एका रशियन मॉडेलचा मृतदेह आढळल्याची माहिती समोर आल्यामुळं एकच खळबळ माजली आहे. सुटकेसमधून तिचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. साधारण एक वर्षापूर्वीच तिनी राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांची निंदा केली होती.
पुढे थेट ती बेपत्ता असल्याचीच बातमी समोर आली. तिच्या निधनाचं वृत्त हाती येताच नवी माहितीही समोर आली आहे.
या 23 वर्षीय़ मॉडेलचं नाव ग्रेटा वेडलर (Greta Wedler) असं आहे. तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट करत यामध्ये रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना मनोरुग्ण म्हटलं होतं.
सूत्रांच्या माहितीनुसार या मॉडेलचा Ex Lover दिमित्री कोरोविन यानं ग्रेटाची हत्या केल्याचा गुन्हा कबुल केला आहे. पैशांवरून झालेल्या वादानंतर मॉस्को येथे त्यानं तिची गळा घोटून हत्या केली होती.
उघड झालेलं हे सत्य पाहता, मॉडेलच्या निधनाचा आणि तिच्या राजकीय भूमिकेचा काहीही संबंध नसल्याचं आता स्पष्ट होत आहे.
तीन दिवसांपर्यंत मृतदेहासोबतच राहिला
चौकशीमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार तो 3 रात्री हॉटेलच्या एका खोलीत ग्रेटाच्या मृतदेहासोबतच राहिला. एक नवी सुटकेस खरेदी करत त्यानं त्यामध्ये त्यानं तिचा मृतदेह ठेवला.
त्यानं ही सुटकेस 300 मैल दूर असणाऱ्या लिपेत्सक येथे एका कारच्या डिग्गीमध्ये टाकलं. या घटनेला एक वर्षाहून अधिक काळ लोटला.
मॉडेलच्या सोशल मीडियावर तो फोटो आणि व्हिडीओ, मॅसेज शेअर करत राहिला. जेणेकरुन ती अद्यापही हयात असल्यावर तिच्या मित्रांचा विश्वास बसावा.
मित्रांना संश आला आणि...
दरम्यानच मॉडेलच्या एका मित्राला काहीतरी चुकत असल्याचा संशय आला आणि त्यानं ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आणि तिच्या मृतदेहाचा शोध घेतला.
पुतीन यांच्याबद्दल काय म्हणालेली ग्रेटा?
पुतीन यांच्यावर टीप्पणी केल्यानंतर महिन्याभरातच ग्रेटाची हत्या करण्यात आली होती. 'लहानपणी पुतीन यांचा बराच अपमान झाला, ते सवर्वसामान्य शारीरिक रुपामुळं कधीच धीरानं उभे राहू शकले नाहीत. ही आश्चर्यकारक बाब नाही की त्यांनी वकिली सोडत केजीबीचा आधार घेताला', असं तिनं पोस्टमध्ये लिहिलेलं.
लहानपणापासून लोकं घाबरट असतात. आवाज आणि अंधाराची त्यांना भीती असते, यासाठीच सावधगिरी, संयम आणि अशा काही लक्षणांची कमतरता त्यांच्यात जाणवू लागते, असं म्हणत तिनं त्यांना मनोरुग्ण म्हटलं होतं.
पुतीन यांच्यावर अशा प्रकारे व्यक्त होणारी ही अभिनेत्री पाहता पाहता चर्चेत आली आणि एके दिवशी तिच्या निधनाचीच बातमी समोर आली.