नवी दिल्ली : Russia-Ukraine crisis : रशियाचा मित्र देश असलेल्या बेलारूसनेही युक्रेनच्या उत्तरेकडून सैन्य कारवाई सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. बेलारूसचे सैन्य रशियासोबत आक्रमण करणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे हे युद्ध भयंकर स्वरूप धारण करू शकते अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
बेलारूसचे सैन्य युक्रेनच्या उत्तर सिमेवर रशियाच्या सैन्याला मिळाले आहे. युक्रेनच्या पूर्वेकडून रशियाने आक्रमण सुरू केले असून आता उत्तरेकडूनही युक्रेनवर आक्रमण करण्यात आले आहे.
रशियाने सोमवारी युक्रेनच्या दोन प्रातांना स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा दिला होता. त्यानंतर आज रशियाने युक्रेनशी थेट युद्ध सुरू केले आहे.
रशियाने पुकारलेले आक्रमण परतावून लावण्यासाठी युक्रेनच्या फायटर जेटनेही आक्रमण केले असून, युक्रेनच्या फायटर जेट आणि सैन्याने पूर्वेकडील प्रातांत रशियन सैन्यावर तीव्र गोळीबार सुरू केला आहे.
रशियाने युक्रेनच्या कीव शहरातील विमानतळ आणि इतर अनेक विमानतळांवरही क्षेपणास्त्र हल्ले केले आहे.